गुगल पाठोपाठ ट्विटरची धुराही भारतीय खांद्यावर; पराग अग्रवाल Twitter चे नवे सीईओ! SaamTvnews
देश विदेश

गुगल पाठोपाठ ट्विटरची धुराही भारतीय खांद्यावर; पराग अग्रवाल Twitter चे नवे सीईओ!

ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी दिला राजीनामा!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ट्विटरचे (Twitter) मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी (Jack Dorsey) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ट्विटरच्या तांत्रिक विभागाचे प्रमुख व आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी (IIT) पराग अग्रवाल हे आता नवे सीईओ असणार आहेत. आपल्या राजीनाम्याचे पत्र प्रसिद्ध करत डॉर्सी यांनी म्हटलं आहे की, कंपनीत सह-संस्थापक, सीईओ ते अध्यक्ष ते कार्यकारी अध्यक्ष ते अंतरिम-सीईओ ते सीईओ अशा भूमिका पार पाडल्यानंतर मी आता ठरवलंय की आता थांबण्याची वेळ आली आहे. पराग अग्रवाल हे आता आमचे नवीन सीईओ असणार आहेत.

ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती स्वत:च्या ट्विटर हँडलवरुन दिली आहे. आपलं पद सोडताना त्यांनी ट्विटरचे पुढील सीईओ पराग अग्रवाल असतील, असे देखील सांगितले आहे. ट्विटरच्या संपूर्ण बोर्डाने त्यांना एकमताने पुढील सीईओ म्हणून निवडल्याचंही त्यांनी सांगितलंय.

डॉर्सी यांनी 2006 साली ट्विटरच्या स्थापनेमध्ये मदत केली होती. 2008 पर्यंत त्यांनी सीईओ म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते या पदावरुन पायउतार झाले होते. मात्र, तत्कालीन सीईओ डिक कोस्टोलो यांनी पद सोडल्यानंतर ते पुन्हा सीईओ म्हणून रुजू झाले होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: मोदी सरकार बेरोजगारांना २,५०० रुपये देणार? काय आहे केंद्राच्या योजनेचं सत्य?

वयाची तिशी गाठलेल्यांनाही होतोय डायबिटीज; 'ही' 5 लक्षणं दिसताच करा चेकअप

Made in Pakistan Cosmetics: पाकच्या सौंदर्यप्रसाधनांचा राज्यात सुळसुळाट; ‘गोरी ब्युटी क्रीम’चं संगमनेर कनेक्शन

Pakistan Blast: शांतता रॅलीदरम्यान मोठा स्फोट; ७ जण ठार, १८ जखमी

'सर्वच क्षेत्रात वजन कमी, येणारा काळ आपलाच, आम्हाला बोलता न येणारी खाती मिळाली, मुंडे भाऊ-बहिणीच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT