Breaking News: चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री Saam TV
देश विदेश

Breaking News: चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाबमधीलच नव्हे तर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले.

वृत्तसंस्था

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाबमधीलच नव्हे तर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. त्यानंतर नवीन मुख्यमंत्री कोण याबाबत चर्चा सुरु होती. AICC च्या झालेल्या बैठकीत चरणजित सिंग चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.अशा प्रकारचे ट्विट हरीष रावत यांनी केले आहे. पंजाब काँग्रेसच्या (Panjab Congress) भांडणात, काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांना हटवण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसच्या कार्यवाहक राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना हटवण्याची तयारी सुरू होती. राजीनाम दिल्यानंतर पंजाब काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला कॅप्टन अमरिंदर सिंग अनुपस्थित राहिले होते.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधींना फोन करून राजीनाम देण्याची इच्छा व्यक्त केली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्याशीही त्यांनी बोलणी केल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, अशीही चर्चा आहे की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकल्यास काँग्रेस सोडण्याची धमकीही दिली आहे. बातम्या येत आहेत की त्यांनी हायकमांडला सांगितले आहे की जर पक्षाचा हा त्रास संपला नाही तर ते पक्षही सोडतील.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेचं ठरलं, जागांवर अडलं? युतीच्या घोषणेला जागावाटपाचा अडसर?

Maharashtra Live News Update: मनमाड-येवला मार्गावरील अंकाई शिवारात टँकरची रिक्षाला धडक, 6 जण जखमी

Yerwada jail : धक्कादायक! येरवडा कारागृहात हाणामारी; कंबर आणि डोक्यात फरशी घातली, आरोपीचा मृत्यू

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT