pakistani tiktoker Saam Tv
देश विदेश

धक्कादायक! टिकटॉक व्हिडिओसाठी तरुणीने लावली जंगलाला आग; त्यानंतर...

पाकिस्तानी तरुणीने पसुरी या ट्रेंडिंग गाण्यावर व्हिडिओ बनवला आहे

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : टिकटॉक व्हिडिओतून प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते. टिकटॉक (Tik Tok video) अॅपवर शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी वापरकर्ते वाटेल ते करतात. सध्या भारतात (India) टिकटॉक अॅप बंद करण्यात आले आहे. मात्र अजूनही काही असे अनेक देश आहेत, जिथे टिकटॉकचा आपल्या मोठ्या प्रमाणात केला जातो. सध्या पाकिस्तानी टिकटॉक (Pakistani Tiktoker) स्टारचा एका व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या तरुणीने टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी थेट जंगलाला आग लावली. यामुळे आता ती वादात सापडली आहे. (Pakistani Tiktoker Humaira Asghar Set Fire To a Forest For a Tik Tok video)

15 सेकंदाचा टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी या तरुणीने थेट जंगलाला आग लावली आहे. माहितीनुसार, हा व्हिडिओ पाकिस्तानातील असल्याचं सांगितलं जातं आहे. या पाकिस्तानी तरुणीने पसुरी या ट्रेंडिंग गाण्यावर व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ तरुणीने मनोरंजनासाठी बनवला होता. मात्र, सोशल मीडियावर तो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या तरुणीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी करत आहेत.

दरम्यान, व्हिडिओत दिसणाऱ्या या तरुणीचे नाव हुमायरा असगर असं आहे. हुमायराने गाऊन घातला आहे आणि ती स्टाईलमध्ये पुढे येत आहे. पार्श्वभूमीत जंगल दिसत असून त्याचा मोठा भाग आगीने पेटला आहे. या लोकेशनवर त्याने अनेक व्हिडिओ बनवले आहेत. त्यापैकी एकाच्या ब्रेकगाऊंडमध्ये 'आग से आग बुझेगी कैसे...' हे हिंदी गाणे ऐकू येत आहे. या गाण्यावर आणि लोकेशनवर हुमायरा स्टाईलमध्ये चालताना दिसत आहे. पाकिस्तानी टिकटॉक स्टारचा हा व्हिडिओ सध्या जगभरात व्हायरल झाला आहे. जंगलाला आग लावल्याचा आरोप करत लोकांनी हुमायरावर टीका केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोर कमिटीचे महत्त्वाची बैठक पार पडली

Pollution Alarm: पुणेकरांच्या फुफ्फुसात विषारी धूळ; हवेत दर तासाला मिसळलं जातंय 6 टन सिमेंट

EPFO चा ऐतिहासिक निर्णय; आता UPI द्वारे पीएफ काढता येणार?

husband wife clash : पतीचा फोन हिसकवाल तर जेलमध्ये जाल? तक्रार केल्यास 3 वर्षांची शिक्षा, दंडही लागणार?

Maharashtra Politics: काँग्रेस-हिंदुत्ववादी रस्त्यावर भिडले; काँग्रेस प्रवक्त्यावर हल्ला,राजकारणाचा कल्ला

SCROLL FOR NEXT