Pakistan Terror Attack: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर भीषण हल्ला केला आहे. अवैध सोने खणनाविरोधातील कारवाईसाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीवर डोंगरावरून अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. या रक्तरंजित हल्ल्यात डीएसपी (DSP) आणि सब-इन्स्पेक्टरसह तब्बल ११ पोलिसांचा जागीच मृत्यू झाला आहे.
डॉनच्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी पोलिसांच्या गाड्यांनाही आग लावली आहे. या घटनेमुळे पाकिस्तानातील सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांचे पथक कोहाट जिल्ह्यातील गुंबट कोहाट परिसरात एका कारवाईसाठी निघाले होते. कोहाट आणि करक जिल्ह्यांच्या सीमेवरील दरबोकाच जालंधर बांदा परिसरात दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांच्या गाडीवर अचानक गोळीबार केला.
'द एक्सप्रेस ट्रिब्यून' वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, हल्लेखोरांनी डोंगरावरून पोलिसांच्या वाहनांवर अंदाधुंद गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात गुंबटचे डीएसपी हैदर जमान आणि उपनिरीक्षक मुख्तियार यांच्यासह तब्बल ११ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याचा खैबर पख्तुनख्वाचे राज्यपाल फैसल करीम कुंडी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. राज्यपालांनी शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यादरम्यान पोलिसांची ५ मोबाईल वाहनेही जाळण्यात आली. यावेळी पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी अतिरिक्त पोलीस वाहने पाठवण्यात आली. या हल्ल्याचा सामना करण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.