Flood Viral Video Saam
देश विदेश

आईचा मृतदेह पुराच्या पाण्यात तरंगत राहिला, ५ वर्षाच्या मुलानं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण..., ह्रदय पिळवटून टाकणारा VIDEO

Flood Viral Video: पंजाबमधील पूरग्रस्त भागातील भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. ५ वर्षीय मुलगा मृत आईला उठवण्यासाठी पाण्यात रडत उभा.

Bhagyashree Kamble

  • पंजाबमधील पूरग्रस्त भागातील भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

  • ५ वर्षीय मुलगा मृत आईला उठवण्यासाठी पाण्यात रडत उभा.

  • चिमुकल्याची निरागसता आणि वेदना पाहून नेटिझन्स भावूक.

  • लाखो लोकांनी व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया दिल्या; अनेकांचे डोळे पाणावले.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून दगडाच्या ह्रदयालाही पाझर फुटेल. या व्हायरल व्हिडिओमध्ये निष्पाप लहान मुलगा आईच्या मृतदेहाला पुराच्या पाण्यातून बाहेर काढताना दिसून येत आहे. तसेच हुंदका देत रडत असल्याचं दिसून येत आहे. हा व्हायरल व्हिडिओ पाकिस्तान क्षेत्रातील पंजाबमधील पूरग्रस्त भागातील असल्याची माहिती आहे. या व्हिडिओमध्ये निष्पाप मुल आईला हाक मारताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये सुमारे पाच वर्षांचा एक निष्पाप मुलगा पुराच्या पाण्याच्या मध्यभागी उभा असलेला दिसून येत आहे. त्याच्या जवळच त्याच्या आईचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसत आहे. मुलगा आपल्या आईला वारंवार उठवण्याचा प्रयत्न करत आहे. रडून हाक मारताना दिसत आहे. चिमुकला आईचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.

त्या निरागस मुलाच्या डोळ्यांत अजूनही आशा आहे की, आई फक्त थकली असेल. झोपली असेल आणि एका हाकेवर जागी होईल. तरीही आईचा मृतदेह पाण्याबाहेर आणण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ पाहून कुणाच्याही डोळ्यांत अश्रू येईल.

हा व्हिडिओ @Tuwit_Tiger या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी तो पाहिला आहे. अनेक वापरकर्त्यांनी हा व्हिडिओ पाहून भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिलं, "डोळ्यांतून अश्रू थांबत नाहीत." सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbaugcha Raja : ३३ तासांनी लालबागच्या राजाचं अखेर विसर्जन, पाहा शेवटची झलक; VIDEO

Iron Deficiency : जास्त चहा प्यायल्याने शरीरात आयरनची कमतरता होते का?

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला २४ तास उशीर, जबाबदार कोण? अध्यक्षांकडून दिलगिरी

Lalbaugcha Raja Visarjan : ‘पुढच्या वर्षी लवकर या’ लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले

Lalbaghcha Raja : फटाक्यांच्या आतिषबाजीत लालबागच्या राजाला दिला निरोप, VIDEO

SCROLL FOR NEXT