PM Modi Saam Tv
देश विदेश

PM Modi News : तब्बल ८ वर्षांनंतर पाकिस्तानकडून PM मोदींना भेटीचं निमंत्रण, मोठं कारण आलं समोर...,

President Shahbaz Sharif Invited PM Modi To Pakistan : तब्बल ८ वर्षांनंतर पाकिस्तानकडून पंतप्रधान मोदींना भेटीचं निमंत्रण मिळालं आहे. या भेटीमागे नेमकं काय कारण आहे, हे आपण जाणून घेवूया.

Rohini Gudaghe

मुंबई : भारत पाकिस्तानमधील तणावाचं वातावरण जगजाहीर आहे. दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानकडून पंतप्रधान मोदींना भेटीचं निमंत्रण मिळालंय. तब्बल ८ वर्षांनंतर मोदींना पाकिस्तानकडून निमंत्रण मिळाल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. आता पाकिस्तानने मोदींना का बोलावलं आहे, मोदी पाकिस्तानला जाणार का? याकडे संपू्र्ण जगांचं लक्ष लागलेलं आहे.

पाकिस्तानकडून PM मोदींना भेटीचं निमंत्रण

पाकिस्तानचं पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तान भेटीचं निमंत्रण (Pakistan President Shahbaz Sharif) दिलंय. शाहबाज शरीफ यांनी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या इतर नेत्यांसह पंतप्रधान मोदींना देखील यंदा आमंत्रित केलंय. कौन्सिल ऑफ गव्हर्नमेंटच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी हे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

कारण काय?

पाकिस्तानी वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार ही बैठक १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मागील आठ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानांना पाकिस्तानने आमंत्रित केलंय. भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक दिवसांपासून तणाव सुरू ( Invited PM Modi To Pakistan) आहे. तरीही भारत आणि पाकिस्तानमध्ये सहकार्य करण्यात यश मिळताना दिसतंय . पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी२०२३ मध्ये भारतात झालेल्या एका बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी भारताच्या बाजूने आता या बैठकीला कोण उपस्थित राहणार? याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मोदी पाकिस्तानला जाणार?

पाकिस्तानच्या निमंत्रणानंतर आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi News) पाकिस्तानात जाणार का? त्यांच्या जागी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी इतर कोणत्या मंत्र्याला पाठवणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे . सध्या एससीओचं अध्यक्षपद पाकिस्तानकडे आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही एससीओचे सदस्य आहेत. या संघटनेचं नेतृत्व मात्र चीन आणि रशिया करत आहे, त्यामुळे भारत (India Pakistan Relation) याबाबत अत्यंत सावध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT