Quetta Railway Station Bomb Blast CCTV Video Saam Tv
देश विदेश

Pakistan Bomb Blast: पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट, थरारक CCTV VIDEO आला समोर

Quetta Railway Station Bomb Blast CCTV Video: एका आत्मघाती हल्लेखोराने रेल्वे स्थानकावर हा स्फोट घडवून आणला. हा बॉम्बस्फोट झाला त्यावेळी रेल्वे स्थानकावर १०० पेक्षा अधिक प्रवासी उपस्थित होते.

Priya More

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये सैनिक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. या बॉम्बस्फोटाचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

एका आत्मघाती हल्लेखोराने रेल्वे स्थानकावर हा स्फोट घडवून आणला. हा बॉम्बस्फोट झाला त्यावेळी रेल्वे स्थानकावर १०० पेक्षा अधिक प्रवासी उपस्थित होते. बॉम्बस्फोटाची ही घटना रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट झाल्यानंतर प्लॅटफॉर्मवर सगळीकडे मृतदेह पडले होते. रेल्वे स्टेशनचे छत उडून गेले होते. त्याचसोबत प्लॅटफॉर्मवर असेलेला चहाचा स्टॉल आणि प्रवाशांच्या बॅग्स इकडे तिकडे उडून गेल्याचे देखील दिसत आहे.

बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या फुटीरतावादी संघटनेने एका निवेदनात या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा बॉम्बस्फोट रेल्वे स्टेशनवर उपस्थित असलेल्या इन्फंट्री स्कूलच्या सैनिकांना लक्ष्य करून करण्यात आला होता. या बॉम्बस्फोटामध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये डझनभर सैनिक आणि सहा रेल्वे कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या बॉम्बस्फोटामध्ये ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जखमींवर नजीकच्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT