Peshawar police lines area Blast News  Saam TV
देश विदेश

Pakistan Blast News: पाकिस्तानच्या पेशावरमध्ये मशिदीत मोठा स्फोट, ५० जण जखमी

Peshawar Police Lines Area Blast : स्फोटानंतरच्या विदारक परिस्थितीचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Saam TV News

Peshawar : पाकिस्तानमधील पेशावरमध्ये एका मशिदीत मोठा स्फोट झाला. या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत. वृत्तानुसार, जवळपास ५० नागरिक जखमी झाले आहेत. पेशावर पोलीस लाइन्स परिसरातील मशिदीत हा स्फोट झाला. स्फोटामुळं भिंत कोसळली आहे.

स्फोटानंतरच्या विदारक परिस्थितीचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्फोटानंतर मशिदीत एकच गोंधळ उडाल्याचे या व्हिडिओंमधून दिसून येत आहे. नागरिक एकमेकांच्या मदतीला धावून जात असल्याचे दिसते. स्थानिकांकडून जखमींना रुग्णालयात पोहोचण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचेही पाहायला मिळते. (Pakistan News)

स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार, स्फोटानंतर जखमी झालेल्या नागरिकांना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात येत होते. मशिदीत काही नागरिक नमाज पठण करत होते, त्याचवेळी हा भयंकर स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पेशावरमध्ये स्फोटाची पहिलीच घटना नाही...

पेशावरच्या मशिदीत स्फोट होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी मार्च २०२२ मध्ये मशिदीत मोठा स्फोट झाला होता. त्यात किमान ५७ नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर जवळपास २०० जण जखमी झाले होते. नमाजावेळीच हा स्फोट झाला होता. मशिदीत मोठ्या संख्येने नागरिक नमाज पठणासाठी एकत्र आले होते. त्यावेळी हा स्फोट झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT