special report x
देश विदेश

भित्र्या पाकड्यांची भेकड चाल, मदरशातील मुलांचा संरक्षण फळी म्हणून वापर; पाहा स्पेशल रिपोर्ट

India Pakistan Tension : भारताच्या हल्ल्याने घायाळ झालेल्या पाकिस्तानच्या मदतीला कोणी येत नाही. अशा स्थितीत मदरशांमधील मुलांचा संरक्षणासाठी वापर करण्याचा पाकचा डाव आहे. पाहूया एक खास रिपोर्ट...

Saam Tv

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी संसदेत केलेलं हे धक्कादायक विधान. मदरशांमध्ये शिकणारे विद्यार्थी म्हणजे आपली दुसऱ्या क्रमांकाची संरक्षण फळी असल्याचं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलंय. आसिफ यांच्या विधानावरून पाकिस्तानमध्ये गदारोळ माजला आहे. शस्त्रांएवजी स्वतःच्या बचावासाठी मदरशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे करत आहे. यावरुन पाकचा खरा चेहरा समोर आला आहे. मदरशांच्या नावाखाली पाकिस्तान दहशतवादी छावण्याच चालवत असल्याच या वक्तव्यावरून सिध्द होतंय .काय म्हणताय पाकचे संरक्षण मंत्री पाहुयात...

भारताच्या प्रत्त्युतरानंतर सीमेवरील 1,000 हून अधिक मदरसे बंद करण्यात आलं आहेत. गरज पडल्यास युद्धात मदरशांमधील मुलांचा वापर करण्याचा पाकचा डाव आहे. भारताच्या हल्ल्यादरम्यान संरक्षणासाठी मुलांचा वापर करण्याची पाकची रणनिती आहे. पीओकेमध्ये असलेल्या छावण्यांमधून मुलांना प्रशिक्षण दिलं जातंय. नियंत्रण रेषेच्या जवळ ठेवून, त्यांना भौगोलिक परिस्थितीची जाणीव करून दिली जाते.

भारतीय सीमेत घुसखोरीचे प्रशिक्षण देखील दिले जाते. गुलपूर, सय्यदना बिलाल किंवा सवाई नाला सारख्या अनेक शिबिरांमध्ये मार्ग नियोजन विशेषतः शिकवले जाते. गरीब किंवा कट्टरपंथी मानसिकतेच्या तरुणांचा समावेश केला जातो. त्यांना आत्मघातकी हल्ल्यांसाठी तयार केले जाते. भारताच्या हल्ल्यानं गांगरलेल्या पाकला आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत मिळत नाही. त्यामुळेच मदरशांमधील मुलांची ढाल केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मोर्चावर बाटली फेकून मारणे योग्य नाही- गिरीश महाजन

Ladki Bahin Yojana: १४ लाख लाडक्या बहिणींनी eKYC केलीच नाही, महत्त्वाची अपडेट आली समोर

Crime News : कर्ज घेतल्याचा फायदा घेतला, पैसे फेडेपर्यंत महिलेवर ३ वर्षे लैंगिक अत्याचार; कोल्हापूर हादरले

राज्यातील साडेचार लाख हेक्टर जमिनींचा प्रश्न सुटणार; देवस्थान जमिनींबाबतचा सरकारचा मोठा निर्णय

Dhurandhar : पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! बॉक्स ऑफिसवर पुन्हा येणार 'धुरंधर' चं तुफान, रणवीर सिंहच्या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT