Pakistan army collapse Google
देश विदेश

Pakistan : फक्त १०० तासांत पाकचा गेमओव्हर, पाकचं लष्कर पुन्हा गुडघे टेकणार | VIDEO

Pakistan army collapse : अवघ्या 100 तासात पाकिस्तानचा गेम ओव्हर होणार आहे... हे आम्ही का म्हणतोय... युद्धाच्या वल्गना करणाऱ्या पाकिस्तानची किती दयनीय अवस्था आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.....

Snehil Shivaji

भारताविरोधात युद्धाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानची हवा फूस्स झालीये. त्याला कारण आहे सैन्य आणि सैन्याचा दारुगोळा. युद्ध आणि ते ही अणुयुद्धाची वल्गना करणाऱ्या पाकिस्तानकडे केवळ 96 तास पुरेल इतकाच दारुगोळा शिल्लक असल्याची माहिती समोर आलीये. युद्धशक्ती कमजोर झाल्यानं पाकची शस्त्र फुसकी ठरणारेत, होय पाकची शस्त्र फुसकी ठरणारेत. असं आम्ही का म्हणतोय ते पाहा..

पाककडे फक्त 4 दिवसांचा दारूगोळा

100 तासांत पाकचा गेमओव्हर

हत्यारं, दारुगोळा विकल्यानं शस्त्र भांडार रिकामं

2023मध्ये दारु गोळा विकून कमावले 364 दशलक्ष डॉलर

सैन्यात रसद कपात, सराव बंद, युद्धाभ्यास नाही

पाकिस्तानची पूर्ण भिस्त ही M109 तोफा, BM-21 मल्टीपल रॉकेट लॉन्चर आणि SH-15 माउंटेड गन सिस्टमवर अवलंबून आहे. सध्या पाकिस्तानकडे तोफा आहेत पण त्यात घालायला गोळे नाहीत. बंदूका आहेत पण गोळ्या नाहीत. लॉन्चर्स आहेत पण रॉकेट नाही रणगाडे आहेत पण चालवायला इंधन नाही. म्हणायला सैन्य आहे पण त्यांना खाऊ घालायला रेशन पाणी नाही म्हणूनच आत्मविश्वास डळमळलेल्या या सैन्यानं मरण्यापेक्षा राजीनामा देणं पसंत केलंय. युक्रेन युद्धात पाकनं संधी शोधत कमाई केली आणि आपल्या देशाला आणि देशाच्या नागरिकांच्या सुरक्षेत चालढकल केल्याचं आता पाकिस्तानातील जनताच म्हणत्येय. कारण पाकनं 2023 मध्ये

42 हजार BM-21 रॉकेट

60 हजार 155mm तोफगोळे

1 लाख 30 हजार रॉकेट

विकून मिलियन डॉलर्सची कमाई करत आपलं सैन्य भांडार रिकामे केले. आणि म्हणूनच आता पाकिस्तानला चीन सारख्या विश्वासघातकी मित्राच्या भरवश्यावर युद्ध लढण्याची वेळ आलीये. आता तर पाकनं तुर्कस्तानकडून युद्धनौका आणून देशातल्या घाबरलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. मात्र हे युद्ध किती अल्पकाळ असेल याची कल्पना पाकच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना देखिल आहे त्यामुळेच केवळ 100 तासात म्हणजेच 4 दिवसात पाकचा खेळ खल्लास होणारेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ठराव पास, तटकरेंची महत्वाची भूमिका; सूनेत्रा पवारांना कोणती मोठी जबाबदारी मिळाली?

Bombil Fry Recipe: कोकणची अस्सल चव, कुरकुरीत बोंबील फ्राय कसे बनवायचे?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात शपथविधी

Royal Enfield Classic 350: किराण्याच्या बजेटमध्ये दारी येईन Royal Enfield,जाणून घ्या EMIचे गणित

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार! २५ वर्षीय तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT