Pakistan Fight Viral Video Saam TV
देश विदेश

Pakistan Fight Viral Video : पाकिस्तानात दोन नेते LIVE शोमध्ये भिडले; एकमेकांना अक्षरश: लाथाबुक्क्यांनी तुडवलं

Viral Video : दोघांमधील वाद एवढा टोकाला गेला की चॅनलच्या लोकांना हस्तक्षेप करावा लागला.

प्रविण वाकचौरे

Pakistan Video Viral :

पाकिस्तानमध्ये लाइव्ह टीव्ही डिबेट शोदरम्यान झालेल्या दोन गेस्टमध्ये तुफान राडा झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इम्रान खान यांच्या पीटीआय आणि पीएमएल-एनचे दोन नेते एकमेकांशी भिडले. दोघांमधील वाद एवढा टोकाला गेला की चॅनलच्या लोकांना हस्तक्षेप करावा लागला.

पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (पीएमएल-एन) सिनेटर अफनान उल्लाह खान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) नेते आणि वकील शेर अफझल खान मारवत हे पाकिस्तानी अँकर जावेद चौधरी यांच्या एक्सप्रेस न्यूज टॉक शोमध्ये चर्चेत सहभागी झाले होते. तिथे एका मुद्द्यावर अचानक वादविवाद सुरू असताना अचानक दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. काही वेळातच वादाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं. यादरम्यान दोन्ही नेत्यांना एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. (Latest Marathi News)

एक्स्प्रेस न्यूजच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाइव्ह शोदरम्यान अफनान उल्लाह खानने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना शिवीगाळ केल्यावर दोघांमध्ये भांडण सुरू झाले. इम्रान खान यांना कथित शिवीगाळामुळे संतप्त झालेला अफजल खान मारवत लाइव्ह शोदरम्यान त्यांच्या जागेवरून उठले आणि अफनान उल्ला यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. (Political News)

पीटीआय नेते शेर अफझल खान मारवत यांनी आरोप केला आहे की, अफनान उल्लाह खान यांनी तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्याविरोधात अपमानास्पद भाषा वापरली. दोघांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर चॅनेलच्या कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत भांडण सोडवलं. मात्र त्याआधी दोघांनी एकमेकांना अक्षरश: लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT