Pakistan Blast X social media
देश विदेश

Pakistan Blast : पाकिस्तानात निवडणुकीआधीच बॉम्बस्फोट; २६ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Pakistan balochistan blast : पाकिस्तानात निवडणुकीआधीच मोठा बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. पाकिस्तानात निवडणुकीच्या मतदानाआधीच दोन ठिकाणी बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात ठिकाणी २६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Vishal Gangurde

Pakistan Blast News:

पाकिस्तानात निवडणुकीआधीच मोठा बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. पाकिस्तानात निवडणुकीच्या मतदानाआधीच दोन ठिकाणी बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात ठिकाणी २६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बलुचिस्थानमधील दोन वेगवेगळ्या ठिकाणी हा स्फोट झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानात पहिला स्फोट बलुचिस्थानमधील पशीन प्रातांत झाला. या हल्ल्यात कमीत कमी १४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेतील काही जणाची प्रकृती चिंताजनक आहे. तर दुसरा स्फोट हा सैफुल्लाह शहरात झाला आहे. एका पक्षाच्या कार्यालयासमोर हा स्फोट झाला. या स्फोटात कमीत कमी १० लोकांचा मृत्यू झाला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतली नाही

पाकिस्तानात निवडणुकीच्या एक दिवसआधीच बॉम्बस्फोट झाला आहे. देशातील दोन ठिकाणी स्फोट झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही. या हल्ल्याचा कार्यवाहक मंत्री गौहर इजाज यांनी निषेध नोंदवला आहे. बलुचिस्थानमध्ये हजारो पोलीस आणि सैनिकांना तैनात करूनही स्फोट झाल्याचे समोर आले आहे.

बलुचिस्थानमध्ये तालिबानचं वर्चस्व

अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेवरवरील बलुचिस्थान इतर देशातील लोकांची येजा वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. बलुचमधील फुटीरतावादी लोक या प्रातांचा हिस्सा मागत आहेत. पाकिस्तानी तालीबानी आणि अन्य दहशतवाही समूहांचं या प्रातांत वर्चस्व आहे.

पाकिस्तानात ८ फेब्रुवारीला मतदान

पाकिस्तानात नवे सरकार निवडण्यासाठी येत्या ८ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान नवाझ शरीफ देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे या निवडणुकीतून इम्रान खान हे बाहेर पडल आहेत. इम्रान खान सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT