Lockdown Saam Tv
देश विदेश

Lockdown: शाळा-कॉलेज बंद, कर्मचाऱ्यांना WFH; भारताशेजारील देशात लॉकडाउन

Iran Isarel war Impact Pakistan Lockdown: इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम आता देशभरात होत आहे. पाकिस्तानमध्ये लॉकडाउनची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Siddhi Hande

पाकिस्तानमध्ये लॉकडाउनसारखी परिस्थिती

शाळा, कॉलेज बंद तर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम

खासदारांच्या पगारात कपात

इराण-इस्त्रायल, अमेरिका युद्धामुळे संपूर्ण जगावर परिणाम होत आहे. जगभरात कच्चे तेल आणि इंधनाचा तुटवडा सुरु झाला आहे. यामुळे अनेक देशात तेल आणि इंधनाची समस्या उद्भवू लागली आहे. यामुळे आता पाकिस्तानने लॉकडाउन झाले आहे. पाकिस्तानने काटकसरीचे उपाय म्हणून अनेक गोष्टी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानमध्ये लॉकडाउन (Pakistan Lockdown)

कच्च्या तेलाच्या तुटवड्यामुळे पाकिस्तानमध्ये लॉकडाउनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारी इंधन भत्त्यामध्ये ५० टक्के कपात केली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे.

पाकिस्तानमध्ये फक्त सरकारी कार्यालये आठवड्यातून चार दिवस खुली राहणार आहेत. याशिवाय शाळा दोन आठवड्यांसाठी बंद राहणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज यांनी सांगितले की, संपूर्ण देश युद्धामुळे ग्रॉसला आहे. यामुळे आर्थिक अडचणी वाढत आहेत.पाकिस्तान संवाद साधून आणि योग्य मार्गाने तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती १०० डॉलरपेक्षा जास्त (Crude Oil Price Hike)

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी इशारा दिला आहे की, जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती १०० डॉलर्सच्या वर गेल्या आहे. जर हे युद्ध असंच सुरु राहिलं तर या किंमती आणखी वाढू शकतात. यामुळे खूप वाईट परिणाम होऊ शकचो. पाकिस्तान हा आखाती देशांमधून येणाऱ्या तेल आयातीवर अवलंबून आहे. तेल आणि गॅसच्या वाढत्या किंमतीवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसत आहे.जागतिक पाळीवर कठीण परिस्थिती आहे. याचा परिणाम पाकिस्तानवर होत आहे, असं शाहबाज यांनी सांगितले.

सरकारी इंधन भत्त्यात ५० टक्के कपात

पाकिस्तानच्या सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. सरकारी खर्च कमी करण्यासाठी पुढील दोन महिन्यांसाठी सरकारी विभागाच्या वाहनांचा इंधन पुरवठा ५० टक्क्यांनी कमी केला जाईल. याशिवाय या काळात ६० टक्क्यांपेक्षा कमी वाहने प्रवास करतील.

खासदारांच्या पगारात कपात

पाकिस्तानचे कॅबिनेट सदस्य,मंत्री, सल्लागार, विशेष सहाय्यकांना दोन महिने पगार होणार नाही. खासदारांच्या पगारात २५ टक्के कपात केली जाईल.३ लाखांपेक्षा जास्त पगार असलेल्या अधिकाऱ्यांचे पगार दोन कमी केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे तीळ पिकाचे नुकसान

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT