Residents of Karachi suffer massive explosion due to gas leak in building; Rescue work started saam tv
देश विदेश

Pakistan Blast: इमारतीत भीषण स्फोट; पाकिस्तान हादरलं! ९ मुलांसह १६ जणांचा मृत्यू, १४ जखमी

Karachi Tragedy Apartment Collapse After Gas Leak : पाकिस्तानातील कराचीमध्ये गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात एका अपार्टमेंट इमारतीचा काही भाग कोसळला. यात किमान १६ जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथके शोधकार्य सुरू ठेवत आहेत.

Bharat Jadhav

  • कराचीतील अपार्टमेंटमध्ये गॅस गळतीमुळे भीषण स्फोट

  • १६ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी

  • महिलां व मुलांचाही मृतांमध्ये समावेश

रमजान महिन्याच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानात दुखद घटना घडलीय. कराचीमधील एका अपार्टमेंटमध्ये मोठा स्फोट झाला असून यात १६ जणांचा मृत्यू झालाय. तर १४ जण जखमी झाले आहेत. सिंध प्रांताची राजधानी कराची येथील एका निवासी भागात हा स्फोट झाला. दरम्यान इमारतीच्या मलब्याखाली अनेकजण अडकल्याची भिती व्यक्त केली जातेय. बचाव दल मदतकार्य करत असून मलब्याखाली कोणी अडकले आहे का? याचा शोध घेतला जात आहे.

गुरुवारी सकाळी एका इमारतीत झालेल्या गॅस गळतीमुळे स्फोट झाला असून यात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मुलांचा समावेश आहे. तर १४ जण जखमी झाले. पोलीस अधिकारी जमशेद अश्रफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना सोल्जर बाजार परिसरातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पहाटे ४:३० वाजता हा स्फोट झाला.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की हा स्फोट गॅस गळतीमुळे झाला असावा. तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक तपशील सांगितला जाईल. मुख्य अग्निशमन अधिकारी हुमायून खान यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले की., "आम्ही अजूनही ढिगाऱ्यातून शोध घेत आहोत आणि आणखी मृतदेह किंवा वाचलेले लोक आहेत का त्याचा शोध घेतला जातोय.

मृतांमध्ये २ ते १७ वयोगटातील किमान नऊ मुले आहेत, तर ७ जण जखमी झाले आहेत. त्यांनी सांगितले की, स्फोट झाल्यामुळे इमारतीचा एक भाग कोसळला. दरम्यान कराचीमध्ये गॅसच्या कमतरतेमुळे कमी उत्पन्न असलेल्या भागातील लोक त्यांच्या घरात एलपीजी सिलिंडर वापरतात.

दरम्यान यावर्षी कराचीमध्ये घडलेली ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. गेल्या महिन्यातही सदर परिसरातील एका बाजारातील गुल शॉपिंग प्लाझा इमारतीच्या तळघरात आग लागली होती. घटनेत किमान ७९ लोकांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. याआधीही जुलै महिन्यात पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे एका घरात लग्नाच्या रिसेप्शन गॅस स्फोट झाला होता. यात वधू-वरांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंड्याला गर्लफ्रेंडसोबतचे कारनामे भोवणार ? पांड्याविरोधात याचिका दाखल होणार ?

दहावीच्या पेपर तपासणीचा मोठा घोटाळा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार? VIDEO

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

SCROLL FOR NEXT