Pahalgam Terror Attack saam Tv
देश विदेश

Pahalgam Terror Attack: घटनास्थळी जा! दहशतवादी हल्ल्यानंतर सौदी अरेबियातून पंतप्रधान मोदींचे निर्देश, अमित शहा श्रीनगरकडे रवाना

Pahalgam Terror Attack: दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात असलेल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ पहलगामजवळ दहशतवादी हल्ला झालाय. यात २७ पर्यटकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळालीय. तर १२ जण जखमी झालेत यात महाराष्ट्रातील ४ जणांचा समोवश आहे.

Bharat Jadhav

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दहशतवादी हल्ल्याची दखल घेतलीय. मोदी सौदी अरेबियाच्या दोन दिवशीय दौऱ्यावर आहेत. दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून संवाद साधलाय. या प्रकरणात ठोस आणि कठोर कारवाई करण्यास आदेश त्यांनी दिलेत.

पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांना घटनास्थळी जाण्याच्या सुचना दिल्या आहेत. दरम्यान, अमित शहा यांनी नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला उपराज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, सीआरपीएफचे महासंचालक, जम्मू आणि काश्मीरचे महासंचालक आणि लष्कराचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

बैठकीनंतर शहा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, दहशतवाद्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही. अमित शहा बीएसएफच्या खास हेलिकॉप्टरने श्रीनगरला रवाना झालेत. त्यांच्यासोबत आयबी प्रमुख आणि गृहसचिव देखील आले आहेत. तिथे पोहोचल्यानंतर, गृहमंत्री एक उच्चस्तरीय बैठक घेतील.या बैठकीत मुख्यमंत्री अब्दुल्ला आणि उच्च सुरक्षा अधिकारी देखील सहभागी होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Oil Benefits: हिवाळ्यात केस गळतीला करा बाय बाय, घरीच बनवा कढीपत्ता, कांदा आणि कोरफडीचा तेल

Maharashtra Live News Update: - अंबाजोगाई बीड रोडवर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात दुचाकीस्वार जागेवर ठार

मोठी बातमी! जामखेडमध्ये हॉटेलवर अंदाधुंद गोळीबार; रोहित पवारांच्या पायात घुसली गोळी

Papad Curry Recipe : रोजची भाजी खाऊन कंटाळलात? मग, झटपट बनवा 'पापड करी'

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासोबत झोपेत भयंकर घडलं; डोक्यावरचे आणि भुवयांवरचे केस कापले|VIDEO

SCROLL FOR NEXT