Pahalgam Terror Attack 
देश विदेश

Pahalgam Terror Attack: जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा हल्ला; स्थानिक नागरिक दहशतवाद्यांच्या टार्गेटवर, घरात घुसून झाडल्या गोळ्या

Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात एका दहशतवाद्याच्या भावाची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली. पहलगाम हल्यानंतर ९ सक्रीय दहशतवाद्यांची घरे उद्धवस्त करण्यात आली आहेत.

Bharat Jadhav

Jammu Kashmir Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. गेल्या २४ तासात सक्रीय दहशतवाद्यांचे घर उद्धवस्त कररण्यात आली आहेत. त्याचदरम्यान दहशतवादी आता स्थानिक नागरिकांना लक्ष्य करत आहेत. कुपवाडा जिल्ह्यात एका घरात घुसून दहशतवाद्यांनी एका व्यक्तीवर हल्ला केलाय.

गोळीबारीमध्ये हा व्यक्ती जखमी झाला त्याला रुग्णालयात नेण्यात आले पण त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आलीय. गोळीबारीमध्ये मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव गुलाम रसूल मगरे आहे. पोलिसांनी सांगितले की, संशयित बंदूकधाऱ्यांनी शनिवारी रात्री उशिरा ४५ वर्षीय गुलाम रसूल मगरे यांची हत्या करण्यात आलीय. कांदी खास येथील त्यांच्या राहत्या घरी बंदूकधारी घुसले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात रसूल मगरे गंभीर जखमी झाले.

"मगरे यांना तातडीने वैद्यकीय सुविधेत नेण्यात आले. तेथून त्यांना श्रीनगरमधील रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. पण त्याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर संयुक्त सुरक्षा दलांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केलीय. जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केलाय.

हत्येमागील हेतू स्पष्ट नसला तरी, सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, मगरेचा भाऊ गुलाम मोहिदीन मगरे नियंत्रण रेषेच्या पलीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) राहतो. मोहिद्दीन हा लष्कर-ए-तैयबा दहशतवादी गटाचा सक्रिय सदस्य असल्याचं सांगितलं जातं. या आठवड्याच्या सुरुवातीला पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये अतिरेकी आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध कारवाई तीव्र केलीय. त्याचवेळी कुपवाडा येथे एका नागरिकाची हत्या झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT