Pahalgam Attack 
देश विदेश

Pahalgam Attack: लष्कर-ए- तैयबाला जोरदार दणका,दहशतवादी आसिफ आणि आदिलचं घर उद्धवस्त

Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यातील 28 देशवासियांच्या मृत्यूनंतर लष्कराने मिशन बदला सुरु केलाय.. त्यात दहशतवाद्यांच्या घरांवर बुलडोजर बॉम्ब टाकण्यात आलाय. ही कारवाई नेमकी कशी केलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुप्रीम मस्कर, साम प्रतिनिधी

आसिफ शेख आणि आदिल ठोकर हेच ते काश्मीरमध्ये बंदुकीच्या जीवावर नंगानाच करणारे हैवान. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी.सुरक्षा दलानं हल्ल्याच्या चौथ्या दिवशीच या नराधमांची घर बॉम्बने उडवून दिले आणि बदल्याच्या फेरीला सुरुवात झाली. सुरक्षा दलाच्या या कारवाईत आसिफ आणि आदिलचं घर पूर्णपणे उद्धवस्त करण्यात आलंय.सरकारने या नीच दहशतवाद्यांच्या घरावर बुलडोजर बॉम्ब टाकलाय.

पहलगाममधील हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांनी आपला जीव गमावला. या घटनेने संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नापाक पाकिस्तानला थेट इशाराच दिला आहे. एकीकडे सैन्यदल अलर्टवर असताना सुरक्षा दलानं ही आता एकएक करून दहशतवाद्यांची नांगी ठेचायला सुरुवात केलीय. ज्या दोन दहशतवाद्याची घर उद्वस्त करून टाकण्यात आली आहेत ते आसिफ अदिल कोण आहेत ते पाहूया.

कोण आहे आसिफ आणि आदिल?

दोघेही लष्कर- ए- तैयबाचे दहशतवादी

आसिफ शेख त्राल येथील रहिवासी

आदिल अनंतनागमधील गुरी गावचा रहिवासी

आदिल ठोकरची 'आदिल गुरी' अशीही ओळख

आदिल 2018 मध्ये प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात

प्रशिक्षण पूर्ण करून आदिल काश्मीरमध्ये परत

हल्ल्यासाठी आदिलची पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत

आसिफ शेख आणि आदिल ठोकर यांची राहती घर उध्द्वस्त करून भारतीय लष्कराने पाकिस्तानला थेट निर्वाणीचा इशाराच दिलाय. दहशतवाद्यांविरोधात देशात सुडाग्नी भडकलाय. त्यामुळे दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठीच. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT