Pahalgam Attack latest VIDEO social media
देश विदेश

Pahalgam Attack Video : कानठळ्या बसवणारा गोळीबाराचा आवाज, पर्यटकांच्या किंचाळ्या; थरकाप उडवणारा पहलगाम हल्ल्याचा नवा व्हिडिओ

Pahalgam Attack Latest Video : पहलगाम हल्ल्याचा नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर बेछूट गोळीबार करण्यात येत आहे. घटनास्थळी कानठळ्या बसवणारा गोळीबाराचा आवाज आणि पर्यटकांच्या किंचाळ्या ऐकायला येत आहेत.

Nandkumar Joshi

पहलगाम हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दलांचे जवान संपूर्ण काश्मीर पिंजून काढत आहे. शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. एनआयएकडून चौकशी सुरू आहे. दुसरीकडं या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय आहे. त्यामुळं भारतानं पाकिस्तानचा श्वास समजला जाणारा सिंधु पाणी करार स्थगित करून त्यांचं नाक बंद केलं आहे. अशातच आता पहलगाममधील घटनास्थळाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

निर्दयी आणि क्रूर दहशतवाद्यांकडून दूर-दूरपर्यंत असलेल्या पर्यटकांवर बेछूट गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर पर्यटक आपला जीव वाचवण्यासाठी जिथे आसरा मिळेल, त्या ठिकाणी लपून बसण्याचा प्रयत्न करत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय?

पहलगाम हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. पठारासारखा भाग आहे. तिथे पर्यटक निसर्गाचा मनसोक्त आनंद घेत असतानाच दहशतवादी घुसले. त्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यावेळी काही अंतरावर पर्यटक जीवाच्या आकांताने ओरडत आहेत. स्वतःला वाचवण्यासाठी प्रत्येक जण मिळेल ती जागा शोधत आहे. चेहऱ्यावरील आनंदाची जागा भीतीनं घेतली आहे.

गोळीबारामुळं प्रचंड गोंधळ

दहशतवाद्यांनी तुफान गोळीबार सुरू केल्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता. क्रूर दहशतवादी खुलेआम गोळीबार करत आहेत. ज्या ठिकाणी पर्यटक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लपून बसले आहेत, त्या दिशेने दहशतवादी जात असताना या व्हिडिओत दिसून येत आहेत.

अनेक पर्यटक तेथील एका कपड्याच्या स्टॉलच्या पाठीमागे लपून बसले आहेत. त्यात घोडेवाले आणि स्थानिक नागरिक देखील आहेत. घोडेवाले तिथेच थांबले आहेत. ते देखील पर्यटकांसोबतच होते. तेथील घोडेवाले पर्यटकांना धीर देण्याचा प्रयत्न करताना या व्हिडिओत दिसून येत आहेत.

किंचाळ्या आणि गोळीबाराचा आवाज

या व्हिडिओत एक सपाट भाग दिसत आहे. मधेच एक खोलगट भाग आहे. एकीकडे गोळीबाराचा आवाज आणि दुसरीकडे पर्यटकांच्या किंचाळ्यांचा आवाज येत आहे. गोळीबाराचा आवाज थांबता थांबत नसल्याचे या व्हिडिओतून दिसून येते. दहशतवादी निर्दयीपणे पर्यटकांवर गोळ्या झाडताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT