हॉटेल आणि प्रवासी बुकिंग करणाऱ्या ओयोनं एक नवीन चेक इन पॉलिसी तयार केलीय. ओयोनं हॉटेल पार्टनरसोबत नवीन चेक इन पॉलिसी तयार केली असून, आता ओयोमध्ये अविवाहीत जोडप्यांना चेक इन करण्यास परवानगी दिली जाणार नाहीये. याची सुरूवात मेरठपासून झाली असून, अविवाहीत जोडप्यांना यापुढे ओयोवरून बुकिंग करता येणार नाहीये.
ओयो कंपनीच्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार, अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेलमध्ये चेक इन करण्याची परवानगी दिली जाणार नाही आहे. कंपनीनं याची सुरूवात मेरठपासून केली असून, त्यासाठी नवीन नियम बनवला आहे. बदललेल्या पॉलिसीनुसार, ओयोच्या चेक इनदरम्यान, जोडप्यांना पुरावा म्हणून कायदेशीर वैध कागदपत्रे दाखवावी लागतील. यामध्ये ऑनलाइन बुकींगचा देखील समाविष्ट आहे.
ओयोनं मेरठमधील पार्टनर हॉटेलला त्वरीत अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खरंतर शहरातील रहिवाश्यांनी अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेलमध्ये चेक इन करण्याची परवानगी न देण्यासाठी याचिका दाखल केली होती. तसेच गेल्या काही दिवसांपासून ओयोवरून बुकिंग झाल्यानंतर काही घटना घडल्या होत्या. याच गोष्टी पाहता ओयोनं आपल्या पॉलिसीमध्ये बदल करण्याचं ठरवलं.
बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, मेरठप्रमाणे इतर शहारांतील हॉटेल्समध्ये अविवाहित जोडप्यांना, ओयो हॉटेल्स रूम्समध्ये चेक इन करण्याची परवानगी दिली नाही पाहिजे. त्यांनी देखील चेक इन करण्यापासून रोखण्यासाठी एक पॉलिसी तयार करायला हवी. तसेच त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. फक्त विवाहित जोडप्यांना कागदपत्रे पाहून त्यांना परवानगी देण्यात यावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.