Airports in India X
देश विदेश

१८ एअरपोर्ट्स बंद, ४३० फ्लाइट्स कॅन्सल; Operation Sindoor नंतर भारत नव्या तयारीत, नेमकं काय होणार?

India pakistan Airstrike: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने एअर स्ट्राईकने घेतला. भारताच्या तिन्ही दलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट केले. यानंतर भारत नव्या तयारीला लागला आहे.

Yash Shirke

भारताने एअर स्ट्राइकद्वारे पाकिस्तानला धडा शिकवला. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला. मध्यरात्री भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट केले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने सीमावर्ती भागांमध्ये गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही प्रतिहल्ल्याला तोंड देण्यासाठी भारताने तयारी सुरु केली आहे. देशातील १८ विमानतळ बंद करण्यात आली आहेत.

फ्लाइटराडार-२४ नुसार, आतापर्यंत सुमारे ४३० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. उड्डाणे रद्द करण्याच्या बाबतीत इंडिगो एअरलाइन्स आघाडीवर होती आणि त्यांच्या सुमारे १६० उड्डाणे रद्द करण्यात आली. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंडीगड आणि राजकोट या विमानतळांवर फ्लाइट्स १० मे सकाळी ५.२९ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, देशातील सर्वात मोठे विमानतळ असलेल्या दिल्ली आयजीआय विमानतळावरुन दुपारी १२ वाजल्यापासून किमान ३५ फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये चार आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सचा देखील समावेश आहे. इंडिगो एअरलाइन्स, अकासा एअर यांनीही विमानसेवा तात्पुरत्या वेळेसाठी बंद राहणार असल्याचे प्रवाशांना कळवले आहे. प्रवाशांना रिफंड मिळेल किंवा तिकीटांचा १० मेनंतर वापर करता येईल असे विमान कंपन्यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: उन्हात गेल्यावर अचानक BP वाढतोय? वाचा रामबाण घरगुती उपाय

विद्यार्थ्यांना दरमहा 2500 रुपये मिळणार? विद्यार्थ्यांसाठी सरकारची नवी योजना?

Kokan Top 10 Places: कोकणात फिरायला जात असाल तर ही TOP 10 ठिकाणं नक्की पाहा, हिरव्यागार निसर्गात जाल हरवून

Maharashtra News Live Update: नेरूळमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

SCROLL FOR NEXT