One Nation One Election saam Tv
देश विदेश

One Nation One Election: 'वन नेशन, वन इलेक्शन'च्या हालचालींना वेग, विधी आयोग लवकरच अहवाल सादर करणार

One Nation One Election: गेल्या काही दिवसांपासून वन नेशन वन इलेक्शनची चर्चा होत आहे. त्यासंदर्भात हालचाली वाढल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

One Nation One Election:

गेल्या काही दिवसांपासून वन नेशन वन इलेक्शनची चर्चा होत असून त्यासंदर्भात हालचाली वाढल्या आहेत. भारतीय कायदा आयोग देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याची शिफारस करणारा अहवाल सादर करणार आहे. देशातील २०२४ आणि २०२९ च्या निवडणुकांसाठी तात्पुरती टाईमलाईन बनवण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. (Latest News)

हा अहवाल २२ व्या विधी आयोगाकडून कायदा मंत्रालयात सादर केला जाणार आहे. कायदा मंत्रालयात एकून तीन अहवाल सादर केले जाणार आहेत. तीनपैकी एक अहवाल हा वन नेशन वन इलेक्शनचा असेल तर इतर दोन अहवाल लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत संमतीच्या किमान वयावर आणि शिफारसींवर असणार आहे. या प्रकरणाची प्रथम माहिती अहवाल ऑनलाइन दाखल करण्याची तरतूद करणारा कायदा केला जाणार आहे.

दरम्यान सरकार लोकसभा, विधानसभा आणि पंचायतीच्या निवडणुका एकावेळी घेण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखील उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. दरम्यान कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीची पहिली बैठक २३ सप्टेंबर रोजी झाली होती. त्यानंतर हा अहवाल सादर तयार करण्यात आलाय.

दरम्यान कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीसाठी समितीमधील इतर सदस्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल, राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, पंधराव्या वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष एनके सिंह, माजी लोकसभेचे सरचिटणीस सुभाष कश्यप आणि माजी मुख्य दक्षता आयुक्त संजय कोठारी उपस्थित होते.

सरकारनं सादर केलेल्या निवेदनानुसार, एक पॅनल चर्चा केल्यानंतर यावर निर्णय घेण्यात येणार आहे. विधी आयोग आणि राजकीय पक्षांकडून याबाबत सूचना मागवण्यात आल्या आहेत. २१ व्या कायदा आयोगाच्या बैठकीत तयार करण्यात आलेल्या मसुदा अहवालात एक राष्ट्र एक निवडणूक कल्पनेची शिफारस करण्यात आली होती. ही बैठक २०१८ मध्ये न्यायमूर्ती बी एस चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT