One Nation, One Election Saam tv
देश विदेश

One Nation One Election: 2024 मध्ये ‘एक देश-एक निवडणूक’ होणे अशक्य? कायदे आयोगाचा महत्वाचा खुलासा

One Nation One Election: २०२४ च्या निवडणूकीत एक देश एक निवडणूक घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, प्रतिनिधी

One Nation One Election:

२०२४ च्या निवडणूका तोंडावर आल्या असतानाच देशात एक देश एक निवडणूकांची चर्चा सुरू झाली होती. केंद्र सरकारकडून एक देश एक निवडणूक घेण्याबाबत हालचालीही सुरू करण्यात आल्या होत्या. याबाबत आता एक महत्वाची बातमी समोर आली असून २०२४ च्या निवडणूकीत एक देश एक निवडणूक घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, देशात होणा-या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी सरकार यावेळपासून 'वन नेशन-वन इलेक्शन'चं धोरण अवलंबणार का? याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. आगामी निवडणुक एकत्र घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 2029 नंतर एक देश एक निवडणूक घेता येऊ शकते, असे संकेत मिळाले आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ आणि २०२९ या दोन लोकसभा निवडणूक चक्रांदरम्यान (इलेक्शन सायकल) एकत्रित निवडणुकांची प्रक्रिया पार पाडण्याची शिफारस विधि आयोगाने केली आहे. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक याद्या एकत्रित करण्याच्या सूचना विधी आयोग देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

निवडणूका एकत्रित पणे घ्यायच्या असतील तर कायद्यात बदल करावे लागतील, मात्र, अद्यापपर्यंत अविश्वास ठरावावेळी सरकार कोसळलं, निवडणूकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही तर अशा वेळी नक्की काय उपाययोजना करायच्या यावर विधी आयोग चर्चा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

SCROLL FOR NEXT