Cheetah Death Saam Tv
देश विदेश

Cheetah Death: कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू; एका महिन्यातली दुसरी घटना, नेमकं काय झालं?

Kuno National Park : उदय नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला असून त्याची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खराब होती.

Priya More

Madhya Pradesh News : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) आणलेल्या आणखी एका चित्ताचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उदय नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला असून त्याची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खराब होती. उपचारादरम्यान उदयचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.

दक्षिण अफ्रिकेच्या नामिबियातून भारताच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये एकूण 20 चित्ते आणण्यात आले होते. त्यापैकी दोन चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता फक्त 18 चित्ते राहिले आहेत. मध्य प्रदेशचे मुख्य वनसंरक्षक जेएस चौहान यांनी सांगितले की, 'या बिबट्याचे नाव उदय होते. उदय सहा वर्षांचा होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. तो आजारी पडला होता. याच वर्षी 18 फेब्रुवारीला उदय नावाच्या चित्त्याला इतर 11 चित्तांसह दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये आणण्यात आले होते.'

'उदयची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खराब होती. रविवारी त्याची प्रकृती आणखी खराब झाली. वनविभागाच्या पथकाने उदयला शांत करून वैद्यकीय केंद्रात उपचारासाठी नेले. पण उपचारादरम्यान रविवारी दुपारी 4 वाजताच त्याचा मृत्यू झाला. या चित्त्याच्या मृत्यूमागचे कारण जाणून घ्यायचे आहे. ', असे जेएस चौहान यांनी सांगितले.

कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्याचा मृत्यू होण्याची ही महिनाभरातील दुसरी घटना आहे. सोमवारी पशुवैद्यकांचे पथक या चित्त्याचे शवविच्छेदन करणार आहे. संपूर्ण शवविच्छेदनाची व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी करण्यात येणार आहे.

मागच्या महिन्यात शाशा नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला होता. डिहायड्रेशन आणि किडनीच्या संसर्गामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. पण, यावेळी उदय नावाच्या चित्त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण समोर आले नाही.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष प्रयत्नांनी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतील 20 चित्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले होते. मोदींच्या या प्रयत्नांमुळे तब्बल 76 वर्षांनंतर देशवासियांना चित्ते पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये अवकाळी पावसामुळे गहू पिकाला फटका

Dal Makhani recipe: रेस्टॉरंट स्टाईल दाल मखनी घरच्या घरी कशी बनवाल, लिहून घ्या रेसिपी

Solapur: माहेरी गेलेल्या बायकोचा परत येण्यास नकार, व्हिडीओ बनवून तरुणाने आयुष्य संपवलं; सोलापुरमध्ये खळबळ

Historical Places : पर्वतरांगांच्या सान्निध्यात अन् नद्यांच्या संगमावर वसलाय 'हा' किल्ला, इतिहासातील अनोखा जलदुर्ग

उत्तर प्रदेशहून पहाटे ट्रेन मुंबईत पोहचली, ४ वाजता पोलिसांनी जनरल डब्ब्यात धाड टाकली, बॅग पाहून सगळेच चक्रावले

SCROLL FOR NEXT