Odisha Train Accident Saam Tv
देश विदेश

Odisha Train Accident: चमत्कारच! तीन रेल्वेच्या भीषण अपघातात 8 महिन्यांची 'चिमुकली' बचावली

चमत्कारच! तीन रेल्वेच्या भीषण अपघातात 8 महिन्यांची 'चिमुकली' बचावली

Satish Kengar

Odisha Train Accident: ओडिशातील बालासोर येथे हृदयद्रावक रेल्वे दुर्घटना घडली आहे. बहंगा रेल्वे स्थानकाजवळचे दृश्य इतके भयावह आहे की, ते पाहून कोणाची थरकाप उडेल. या अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ११७५ जण जखमी झाले आहेत. या अपघाताने अनेक कुटुंबांना आयुष्यभराच्या वेदना दिल्या आहेत. या जखमा इतक्या खोल आहेत की त्या कधीच भरून निघणार नाही. मात्र अपघाताच्या या दुःखद घटनेत ही एक सुखद बातमी समोर आली आहे.

इतक्या भीषण अपघातातून एक आठ महिन्याची चिमुकली चमत्कारिक पद्धतीने वाचली आहे. या चुमुकलीचं नाव दिव्या कुमारी, असं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही चिमुकली थोडक्यात बचावली गेली आहे. तिच्यासोबतच तिचे आई-वडील आणि तीन बहिणीही सुखरूप आहे. या पैकी कोणालाही गंभीर जखम झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्वजण कोरोमंडल एक्सप्रेसच्या अनारक्षित डब्यात प्रवास करत होते. ही चिमुकली तिच्या वडिलांसोबत वरच्या बर्थवर होती. तर तिची आई आणि इतर बहिणी खालच्या बर्थवर होत्या. (Latest Marathi News)

या मुलीचे वडील राजेश तुरिया यांनी अपघाताचा भीषण प्रसंग सांगताना म्हणाले आहेत की, ''अपघात झाला तेव्हा आम्ही झोपलो होतो. जेव्हा मी माझे डोळे उघडले, तेव्हा मी आडवा पडलो होतो. बाळही माझ्या पाठीवर होते. जणू काही चमत्कार घडला आणि ती त्यात वाचली.''

राजेश कामानिमित्त चेन्नईला जात होते. राजेश, त्याची पत्नी आणि मुलींना किरकोळ दुखापत झाली असली तरी अपघात स्थळाजवळील रेल्वे कॅम्पमध्ये प्राथमिक उपचारानंतर सर्वजण सुखरूप आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT