Odisha Train Accident Saam Tv
देश विदेश

Odisha Train Accident: 'देवाने आम्हाला दुसरं आयुष्य दिलं', अपघातातून अख्खं कुटुंब वाचलं, सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग

'देवाने आम्हाला दुसरं आयुष्य दिलं', अपघातातून अख्खं कुटुंब वाचलं, सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग

Satish Kengar

Odisha Train Accident: ओडिशा येथील बालासोर येथे तीन रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. मात्र इतक्या भीषण अपघातातही एकाच कुटुंबातील तीन सदस्य थोडक्यात बचावले आहेत. या अपघातातून बचावल्यानंतर ते पश्चिम बंगालमधील त्यांच्या घरी परतले आहेत.

सुब्रतो पाल, त्यांची पत्नी देबोश्री पाल आणि त्यांचा मुलगा पश्चिम बंगालमधील महिसदल, पूर्वा मेदिनीपूर येथील मालुबासन गावचे रहिवासी आहेत. बालासोरमध्ये भीषण अपघात होण्यापूर्वी ते आपल्या मुलाला डॉक्टरांना भेटण्यासाठी चेन्नईला घेऊन जात होते. वाचलेल्यांपैकी एक सुब्रतो पाल यांनी एएनआयला सांगितले की, या घटनेनंतर त्यांना दुसरं आयुष्य मिळाल्यासारखं वाटत आहे.

याबाबत सुब्रतो पाल म्हणाले आहेत की, "आम्ही काल खरगपूर स्टेशनवरून चेन्नईला निघालो होतो. प्रवासादरम्यान बालासोर स्टेशननंतर ट्रेनला जोरदार धक्का बसला. यानंतर मला डब्यात धूर निघताना दिसला. यानंतर मला काहीच दिसत नव्हतं. त्यावेळी स्थानिक लोकांनी माझ्या मदतीला धावून आले आणि मला ढिगाऱ्यातून बाहेर काढले. जणू देवाने मला दुसरं आयुष्य दिलं.'' (Latest Marathi News)

देबोश्री पाल यांनी अपघातातून वाचल्यानंतर सांगितलं की, अपघाताच्या वेळी पाहिलेली दृश्ये त्यांच्या मनातून कधीही जाणार नाही. त्या म्हणाल्या, "आम्ही आमच्या मुलासाठी डॉक्टरांना भेटण्यासाठी चेन्नईला जात होतो. बालासोरमध्ये अपघात झाला. आम्हाला काहीही समजले नाही. मला लोक एकमेकांवर पडताना दिसले. आम्हाला आमचा मुलगा सापडला नव्हता. आम्ही कसे वाचलो हे माहित नाही. हे आमच्यासाठी दुसरं आयुष्य आहे. मी जिवंत असेपर्यंत ही दृश्ये माझ्या मनातून कधीही निघणार नाही." या घटनेनंतर खऱ्या अर्थाने 'देव तारी त्यास कोण मारी', या म्हणीचं प्रत्यय आलं आहे.

रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 261 वर

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 261 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. जखमींना गोपालपूर, खंटापारा, बालासोर, भद्रक आणि सोरो येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT