Odisha plane crash सोशल मीडिया
देश विदेश

Plane Crash : ओडिशात भयंकर विमान दुर्घटना, ९ जणांना घेऊन जाणारे प्लेन क्रॅश

Odisha plane crash : ओडिशातील राउरकेला येथे इंडिया वन कंपनीचे ९ आसनी छोटे विमान कोसळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या अपघातात ६ जण जखमी झाले असून २ ते ३ जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

Odisha plane crash Latest Update : ९ जणांना घेऊन जाणारे विमान ओडिशामध्ये कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर घटनास्थळावर एकच हाहाकार उडाला. इंडिया वन या कंपनीचे हे विमान होतं. उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच ते जमिनीवर कोसळले. तात्काळ घटनास्थळावर मदतकार्य पोहचवण्यात आलेय. विमानात पायलटसह ९ जण प्रवास करत होते. काहींना वाचवण्यात यश मिळाल्याची माहिती स्थानिक मीडियाने दिली आहे.

ओडिशातील राउरकेला येथील रघुनाथपाली परिसरात इंडिया वन या कंपनीचे एक छोटे विमान कोसळले. प्राथमिक वृत्तानुसार, या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. तर तिघांबाबात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. विमानात ९ जण प्रवास करत होते. ६ जखमींना उपचारासाठी तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील दोन ते तीन जणांचा प्रकृती गंभीर असल्याचं समोर आलेय.

वाहतूक मंत्र्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान हे ९ आसनी होते. हे विमान भुवनेश्वरहून रुएक्लाला जात होते. उड्डाण घेतल्यानंतर १० किलोमीटरवर पोहचताच विमानात अचानक बिघाड झाला अन् जमिनीवर वेगात कोसळले. विमानात नेमकं काय बिघाड, घोटाळा झाला, याबाबत तपास केला जात आहे. घटनेनंतर जखमींना वाचवण्यात आले आणि उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा सोनं किती रुपयांना? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं गुजराती भाषेमधून भाषण; सोशल मीडियावर तुफान चर्चा|Video Viral

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Maharashtra News Live Update: पुणे विद्यापीठ कुलसचिवांच्या कार्यालयाच्या बाहेर अभाविप आक्रमक

SCROLL FOR NEXT