Tragic incident in Amroha: 5-year-old Nitya Sharma dies of heart attack in school bus. Saamtv File Pic
देश विदेश

Nursery Student Heart Attack: नर्सरीतून घरी येताना ५ वर्षाच्या मुलीला हृदयविकाराचा झटका; बसमध्येच चिमुकलीचा मृत्यू

5 Year Old Girl Heart Attack : शाळेतून घरी येताना एका ५ वर्षाच्या मुलीचा हर्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशाच्या अमरोहा येथे घडलीय. मृत मुलगी नर्सरीच्या वर्गात होती.

Bharat Jadhav

  • उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे ५ वर्षांच्या नित्या शर्माचा हर्ट अटॅकने मृत्यू झाला.

  • मुलगी नर्सरीच्या वर्गात शिकत होती आणि बसने घरी परतताना घटना घडली.

  • अचानक हृदयविकाराचा झटका येऊन चिमुकलीचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथून एक दुःखद घटना घडलीय.स्कूल बसमधून घरी परतताना एका ५ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय. अमरोहा जिल्ह्यातील राहारा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडलीय. नित्या शर्मा, असं मृत मुलीचे नाव असून ती हैदलपूर गावात ही मुलगी आपल्या कुटुंबियांसोबत राहत होती.

नित्या रहारा परिसरातील एका खासगी शाळेच्या नर्सरीच्या वर्गात शिकत होती. शाळेतून बसने घरी परताना नित्याला हर्ट अटॅक आला, त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी कोणतीच तपासणी न करता मुलीवर अंत्य संस्कार केले. मिळालेल्या माहितीनुसार, नित्या नेहमीप्रमाणे सोमवारी शाळेत गेली होती. दुपारी शाळा सुटल्यानंतर ती आपल्या इतर मैत्रिणीसह स्कूल बसमधून घरी येत होती. वाटेतच तिची तब्येत बिघडली.

तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. बसमधील इतर मुलींना काही कळण्याआधीच नित्याचा मृत्यू झाला. दरम्यान ही माहिती मिळताच नित्याच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नित्याला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मुलीच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, नित्याचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमी पातळीमुळे झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

नित्या दोन बहिणींमध्ये लहान होती. शरिरातील ऑक्सीजन कमी झाल्यानं नित्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरानं सांगितलं. रहारा आरोग्य सार्वजनिक केंद्राचे डॉक्टर म्हणाले की, मुलीचा मृत्यू हर्ट अटॅकने झाल्याचं नोंद करण्यात आली नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT