VIP Security 
देश विदेश

VIP Security: राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ यांच्यासह 9 नेत्यांच्या VIP सुरक्षेत नसणार NSG कमांडो, कोण करणार नेत्यांची सुरक्षा?

VIP Security : केंद्र सरकारने दहशतवादविरोधी कमांडो फोर्स एनएसजीला व्हीआयपी सुरक्षेतून पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Bharat Jadhav

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 9 जणांच्या VIP सुरक्षेतून NSG कमांडो हटवण्यात येणार आहेत. आता त्यांच्या जागी सीआरपीएफ जवान या नेत्यांची सुरक्षा करतील . केंद्र सरकारने याबाबत आदेश दिले आहेत. याशिवाय गृह मंत्रालयाने प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या नवीन बटालियनला मंजुरी दिली आहे. त्यांना अलीकडेच संसदेच्या सुरक्षेतून हटवले जाणार गेले. या बटालियनला सीआरपीएफशी जोडण्याची तयारी सुरू आहे.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने दहशतवादविरोधी कमांडो फोर्स एनएसजीला VIP सुरक्षेतून पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत ९ व्हीआयपींच्या सुरक्षेत कमांडोंना तैनात करण्यात आले होते. आता त्यांची सुरक्षा सीआरपीएफचे जवान करतील. आतापर्यंत झेड प्लस सुरक्षा असलेल्या नेत्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ब्लॅक कॅट कमांडोंवर होती. यात यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बसपा सुप्रीमो मायावती, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर नेत्यांचा समावेश आहे.

या नेत्यांना मिळत होती एनएसजी कमांडोची सुरक्षा

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते एल के आडवाणी, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, बसपा सर्वेसर्वा मायावती, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमन सिंह , गुलाम नबी आझाद, फारुख अब्दुला आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, यांच्या सुरक्षेसाठी एनएसजी कमांडो तैनात होते.

ज्या ९ व्हीआयपींच्या सुरक्षेतून NSG कमांडो काढले जाणार आहेत, त्यांच्याकडे ASL म्हणजेच Advanced Security Line Protocol आहे. म्हणजे जेव्हा VIP कोणत्याही ठिकाणी जातात तेव्हा त्या ठिकाणाची झडती आणि तपासणी घेतली जाते आणि सुरक्षा तपासली जाते. आता सीआरपीएफ या दोन नेत्यांसाठी एएसएल प्रोटोकॉल देखील हाताळणार आहे. आतापर्यंत सीआरपीएफ अमित शहा, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि गांधी कुटुंबासाठी कार्यरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT