आता सिलिंडरसाठी मोजावे लागणार तब्बल 1000 रुपये; पहा सरकारची योजना?  Saam Tv
देश विदेश

आता सिलिंडरसाठी मोजावे लागणार तब्बल 1000 रुपये; पहा सरकारची योजना?

LPG सिलिंडरच्या सबसिडीविषयी मोठी माहिती समोर आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : LPG सिलिंडरच्या सबसिडीविषयी LPG Cylinder मोठी माहिती समोर आली आहे. सरकारच्या एका अंतर्गत मूल्यांकनाद्वारे असे संकेत मिळत आहेत की, LPG सिलिंडरकरिता ग्राहकांना प्रति सिलिंडर तब्बल १ हजार रुपये मोजावे लागत आहेत. कारण केंद्र सरकार LPG सिलिंडरवरचे अनुदान बंद करणार असल्याची शक्यता आहे. अंतर्गत मूल्यांकनानंतर याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मात्र, याविषयी सरकारकडून आजून काही स्पष्टपणे सांगण्यात आले नाही. LPG सिलिंडरवर अनुदान देण्याच्या मुद्द्यावर मोदी सरकारने अनेकदा चर्चा करण्यात आली आहे. पण अद्याप कोणती योजना तयार करण्यात आली नाही. याकरीता सरकारकडे २ पर्याय आहेत. एक म्हणजे सर्वांना कसल्याही अनुदान शिवाय सिलिंडरचा पुरवठा करणं आणि दुसरा म्हणजे काही ग्राहकाकरिता सवलत कायम ठेवणे.

हे देखील पहा-

यामुळे यावरून सध्या अनेक तर्क- वितर्क काढण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या १० लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचा नियम लागू करण्यात येणार आहेत. याशिवाय उज्ज्वला योजनेच्या Ujjwala Scheme लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मिळत राहणार आहे. उर्वरित ग्राहकाकरिता अनुदान सवलत बंद करण्यात येणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दारिद्र्यरेषेखालच्या कुटुंबांना LPG कनेक्शन देण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली उज्ज्वला योजनेला सुरूवात केली होती. ज्यांना शक्य असेल, त्यांनी अनुदान घेणे स्वतःहून थांबवावे असे आवाहन देखील पंतप्रधानांनी केले होते. त्याला देखील मोठ्या प्रमाणात उदंड प्रतिसाद देऊन लाखो जणांनी अनुदान घेणे बंद केले होते. सध्या देशात २९ कोटींहून अधिक LPG कनेक्शन्स असून, उज्ज्वला योजनेअंतर्गत सुमारे ८.८ कोटी LPG कनेक्शन्स देण्यात आली आहेत.

वर्ष २०२०२ मध्ये, जेव्हा कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे जगभर लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. तेव्हा कच्च्या तेलाच्या किंमती घसरले होते. यामुळे LPG सबसिडी योजनेवर भारत सरकारला मदत मिळाली होती, कारण किमती कमी होते आणि सबसिडी बदलण्याची गरज नव्हती. मे २०२० पासून काही LPG संयंत्रांपासून दूर आणि दूर असलेल्या काही भागांना वगळण्यात अनेक क्षेत्रात LPG सबसिडी बंद करण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष २०२१ मध्ये सबसिडीवर सरकारचा खर्च ३,५५९ रुपये होता. आर्थिक वर्ष २०२० मध्ये हा खर्च २४,४६८ कोटी रुपये करण्यात आला होता. दरम्यान, हे डीबीटी योजनेअंतर्गत आहे. जे जानेवारी २०१५ मध्ये सुरू करण्यात आले होते. ज्याअंतर्गत ग्राहकांना विना सबसिडी एलपीजी सिलेंडरकरिता संपूर्ण रक्कम भरावी लागत आहे. याचबरोबर सबसिडीचे पैसे सरकारच्या वतीने ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये परत केले जात आहेत. हा परतावा थेट असल्यामुळे या योजनेला DBTL असे नाव देण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई; पेणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिक मागो आंदोलन

Diwali Bad Impact: दिवाळीत 'या' 5 चुका मुळीच करू नका, भोगावे लागतील मोठे परिणाम

Maharashtra Live News Update : प्रेमाला विरोध; तरुण तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या परिसरात हळहळ

IND Vs AUS : रोहित-विराटचा कमबॅक फसला, गिल-अय्यरही फ्लॉप; ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहज विजय

JEE Exam 2026: जेईई मेन्स सेक्शन १ आणि २ परीक्षांच्या तारखा जाहीर, कधीपासून अन् कसं रजिस्ट्रेशन करायचे?

SCROLL FOR NEXT