Diabetes Treatment saam tv
देश विदेश

Weekly Insulin: भारतात नवं इन्सुलिन लाँच! रोज नाही तर आठवड्यातून एकदाच घ्या इंजेक्शन, किंमत किती?

Diabetes Treatment: नोवो नॉर्डिस्कने भारतात आठवड्यातून एकदाच घेण्याचे 'अवीक्ली' बेसल इन्सुलिन लॉन्च केले आहे. टाइप-1 आणि टाइप-2 मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे इन्सुलिन रोजच्या इंजेक्शनचा त्रास कमी करण्यास मदत करू शकते. किंमत, फायदे आणि वापर जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. डेन्मार्कमधील औषध निर्माती करणारी कंपनी नोवो नॉर्डिस्कने भारतात जगातील पहिलं आठवड्यातून एकदाच घेण्याचं बेसल इन्सुलिन 'अवीक्ली (Awiqli)' उपलब्ध करून दिलंय. हे इन्सुलिन टाइप-1 आणि टाइप-2 मधुमेह असलेल्या प्रौढ रुग्णांसाठी आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे रोज इन्सुलिनचं इंजेक्शन घेण्याची गरज आता उरणार नाही. त्याऐवजी रुग्णांना वर्षभरात फक्त 52 वेळा इन्सुलिन घ्यावं लागणार आहे.

रोजच्या इंजेक्शनच्या त्रासातून सुटका

आतापर्यंत अनेक मधुमेही रुग्णांना दररोज इन्सुलिन घ्यावं लागत होतं. म्हणजेच वर्षभरात जवळपास 365 इंजेक्शन घ्यावी लागत होती. तज्ज्ञांच्या मते, आठवड्यातून एकदाच घेण्याचं हे नवीन इन्सुलिन रूग्णांसाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे रुग्ण नियमितपणे इन्सुलिन घेतील आणि उपचार अर्धवट उपचार सोडणार नाहीत.

काय आहे या इन्सुलिनची किंमत?

कंपनीने 700 युनिटच्या पॅकची किंमत 2,611 रुपये ठेवलीये. म्हणजे एका युनिटची किंमत साधारण 3.73 रुपये पडणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे इन्सुलिन सध्या वापरल्या जाणाऱ्या अनेक रोजच्या बेसल इन्सुलिनपेक्षा 30 ते 40 टक्क्यांनी स्वस्त आहे. उदाहरणार्थ एखाद्या रुग्णाला दररोज 10 युनिट इन्सुलिनची गरज असेल तर त्याला आठवड्यात साधारण 70 युनिट इन्सुलिन घ्यावं लागेल.

भारतातील रूग्णांसाठी हे का फायदेशीर?

जगात सर्वाधिक मधुमेही रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. देशात कोट्यवधी लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. याशिवाय अनेक जण प्री-डायबिटीज या अवस्थेत आहेत. म्हणजे त्यांना पुढे जाऊन मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रोज इंजेक्शन घ्यावं लागतं या भीतीमुळे किंवा गैरसोयीमुळे अनेक रुग्ण वेळेवर इन्सुलिन उपचार सुरू करत नाहीत. अशा वेळी आठवड्यातून फक्त एकदाच घ्यायच्या इन्सुलिनमुळे ही अडचण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.

कसा केला जाणार याचा वापर?

हे इन्सुलिन फ्लेक्सटच (FlexTouch) पेनच्या मदतीने दिलं जाणार आहे. त्यामुळे ते वापरणे अधिक सोप असणार आहे. क्लिनिकल अभ्यासात असंही दिसून आलंय की, हे नवीन इन्सुलिन रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज घेतल्या जाणाऱ्या बेसल इन्सुलिनइतकीच तर काही बाबतीत त्याहूनही अधिक प्रभावी ठरलीये. त्याचप्रमाणे तिची सुरक्षितताही समाधानकारक असल्याचं अभ्यासात आढळलंय.

मधुमेहाच्या उपचारात होणार मोठा बदल

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आठवड्यातून एकदाच घेण्याचं हे इन्सुलिन भारतातील मधुमेही रूग्णांच्या उपचार पद्धतीत मोठा बदल घडवू शकतं. अधिकाधिक रुग्णांनी वेळेवर इन्सुलिन उपचार सुरू केले आणि ते नियमितपणे सुरू ठेवले तर मधुमेहामुळे होणाऱ्या गंभीर गुंतागुंती टाळण्यासही मोठी मदत होणार आहे.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune University: बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणी पुणे विद्यापीठाची मोठी कारवाई; रमेश मुखेकर निलंबित

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ

Face Care: चेहरा धुतल्यानंतर २ मिनिटांच्या आत करा हे काम; मेकअपशिवायही ग्लो करेल चेहरा

तुकाराम मुंढे यांचा शाळांसाठी नवा आदेश; शाळेतील मध्यान्ह भोजनासाठी FDAची नवी नियमावली

Thursday Horoscope : आळस टाळा, 4 राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT