Surabhi Jayashree Jagdish
किडनी आपल्या शरीरातील टॉक्सिन घटक बाहेर टाकण्याचं आणि शरीरातील द्रव संतुलित ठेवण्याचं अत्यंत महत्त्वाचे कार्य करतं. पण जेव्हा किडनी योग्य प्रकारे काम करत नाही तेव्हा शरीरात हळूहळू काही लक्षणं दिसू लागतात. ही लक्षणं अनेकदा आपण दुर्लक्षित करतो आणि त्यामुळे समस्या वाढत जाते.
पाठीच्या खालच्या भागात सतत किंवा तीव्र वेदना होणं हे किडनी समस्येचं लक्षण असू शकतं. किडनी स्टोन, संसर्ग किंवा सूज यामुळे अशा प्रकारच्या वेदना जाणवू शकतात.
किडनी नीट काम करत नसल्यास शरीरातील अतिरिक्त द्रव बाहेर टाकला जात नाही. हा द्रव शरीरात साचल्यामुळे पाय, घोटे आणि पावलांमध्ये सूज दिसू लागते. जास्त वेळ बसल्यावर किंवा उभं राहिल्यावर ही सूज अधिक वाढताना दिसते.
किडनीची कार्यक्षमता कमी झाल्यास शरीरात टॉक्सिन घटक साचू लागतात. यामुळे सतत थकवा, अशक्तपणा आणि कमी ऊर्जा जाणवते. विश्रांती घेतल्यानंतरही हा थकवा कमी होत नसेल तर ते धोक्याचं लक्षण आहे.
किडनी नीट काम करत नसल्यास शरीरात टॉक्सिन घटक वाढू लागतात. यामुळे मळमळ, उलट्या आणि भूक कमी होणं अशी लक्षणं दिसू शकतात. यावेळी तोंडात विचित्र किंवा धातूसारखी चव जाणवते.
किडनीचं मुख्य काम शरीरातील टॉक्सिन घटक बाहेर काढणं असतं. ज्यावेळी हे कार्य नीट होत नाही, तेव्हा हे घटक शरीरात साचू लागतात. यामुळे शरीरात सूज, अस्वस्थता आणि विविध आरोग्य समस्या निर्माण होतात.
ही लक्षणं सुरुवातीला सौम्य स्वरूपात दिसतात, पण वेळेत लक्ष न दिल्यास ती गंभीर होऊ शकतात.
दीर्घकाळ ही लक्षणं टिकून राहिल्यास किडनीचं कायमस्वरूपी नुकसान होण्याचा धोका असतो.