Kim Jong Un News twitter
देश विदेश

Kim Jong Un : पूरग्रस्तांना मदत केली नाही, ३० सरकारी अधिकाऱ्यांना थेट फासावर लटकवलं, कुठं घडली घटना?

North Korea News : पूरग्रस्तांना मदत केली नसल्याने ३० सरकारी अधिकाऱ्यांना थेट फासावर लटकवल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे. उत्तर कोरियात हा प्रकार घडला आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : उत्तर कोरियातील हुकूमशहा किम जोंग उन हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर कोरिया देशात महापूर आल्यानंतर मदतकार्यात कुचकामी ठरलेल्या ३० अधिकाऱ्यांना फासावर लटकवलं आहे. तसेच त्यांनी आणखी काही अधिकाऱ्यांना फाशी द्यायची शिक्षा सुनावली आहे. उत्तर कोरियातील या महापुरात आतापर्यंत १००० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चागांग प्रांतात मुसळधार पाऊस आणि भूस्सखलनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. आतार्यंत या पुरात ४१०० घरे आणि ७४१९ एकर शेतजमीन पुरामुळे प्रभावित झाली आहे. या महापूरात मदत मिळत नसल्याने तेथील स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर कोरियामधील सरकारने त्यांच्या सरकारी अधिकाऱ्यांना कडक कारवाई करण्याचा निश्चय केला आहे. महापुरादरम्यान मदतकार्यात कुचकामीपणा केल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर आहे. त्यानंतर किम जोंग उन यांनी त्यांना भयंकर शिक्षा दिली आहे. या प्रकरणात आणखी काही अधिकाऱ्यांना शिक्षा देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. मागील महिन्यात झालेल्या महापुरानंतरही २० ते ३० अधिकाऱ्यांना ठार मारलं होतं.

उत्तर कोरियातील वृत्त वाहिन्यांनी सांगितलं की, 'किम जोंग उन यांनी जुलैमध्ये चीनच्या सीमेजवळ चागांग प्रातांत महापूर आल्यानंतर कुचकामी करणाऱ्या अधिकाऱ्यांना भयंकर शिक्षा देण्याचे आदेश दिले होते. केसीएनए अनुसार, सिनुइजूमध्ये झालेल्या एका बैठकीत किम जोंग उन यांनी जबाबदारी व्यवस्थित न पार पडणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक शिक्षा देण्याचा निर्णय ठरवला होता.

जुलै महिन्यातही उत्तर कोरियामधील उत्तर-पश्चिम प्रांतात महापूर आला होता. या महापूरामुळे अनेक लोक बेघर झाले होते. यावेळी अनेक जणांचा मृत्यू झाला होता. दक्षिण कोरियातील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या महापुरात १००० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.

दरम्यान, किम जोंग उन यांच्यासाठी काही हा नवा आदेश नाही. या आधी देखील किम जोंग उन यांनी अधिकाऱ्यांना फासावर लटकवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी २०१९ साली देखील शासकीय कामात कुचकामीपणा करणाऱ्या अधिकाऱ्याला फासावर लटकवण्याचे आदेश दिले हेते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chunar Teri Sarke : वाईट शब्द, घाणेरडा डान्स; बॉलिवूडमधील १० अश्लील गाणी, ऐकून येईल चिड

Maternity Leave: मुलांना दत्तक घेतलेल्या महिलांनाही मिळणार मॅटर्निटी लिव्ह, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

IPL 2026 injury update: IPL सुरू होण्याआधीच मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडण्याच्या मार्गावर

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता इतक्या टक्क्यांनी वाढणार; महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra Live News Update : नागपुरात वीजकेंद्रांना ड्रोन हल्ल्याची धमकी, प्रशासनात खळबळ

SCROLL FOR NEXT