Uttar Pradesh News  Saam Tv
देश विदेश

Uttar Pradesh News : टिफीनमध्ये नॉनव्हेज आणलं; मुख्याध्यापक संतापले, विद्यार्थ्याला शाळेतून थेट सस्पेंड केलं, VIDEO पाहा

Non veg controversy private school campus Uttar Pradesh : उत्तर प्रदेशमध्ये एका विद्यार्थ्याने टिफीनमध्ये बिर्याणी आणली. त्यामुळे त्याला शाळेतून निलंबित केल्याची घटना समोर आलीय.

Rohini Gudaghe

मुंबई : उत्तर प्रदेशच्या अमरोहामधील एका खासगी शाळेतून धक्कादायक घटना समोर आलीय. टिफीनमध्ये मासांहार आणल्यामुळे त्याला थेट शाळेतून निलंबित केलंय. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगात फिरत आहे. बिर्याणी आणल्यामुळे अमरोहामधील शाळेतील विद्यार्थ्याला थेट निलंबित केल्यामुळे मोठी खळबळ माजली होती. शाळेत सध्या तणावाचं वातावरण असल्याची माहिती मिळतेय.

टिफीनमध्ये बिर्याणी आणली

यूपीमधील अमरोहा येथील एका खासगी शाळेत एका विद्यार्थ्याने टिफिनमध्ये बिर्याणी आणली होती. यावरून वाद निर्माण झालाय. या प्रकरणानंतर मुलाच्या आईने शाळेच्या मुख्याध्यापकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Non veg controversy) केलाय. यावर जिल्हा प्रशासनाने व्हायरल व्हिडिओची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची टीम तयार केली. तपास पथकाच्या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. ही माहिती आज तकच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

शाळेतून निलंबित केलं

अमरोहा येथील एका खासगी शाळेतील मुख्यापध्याकाचा हा व्हिडिओ या विद्यार्थ्याच्या आईने बनवलेला (Uttar Pradesh News) आहे. यामध्ये मुलाची आई आणि मुख्याध्यापक यांच्यात बाचाबाची झाल्याचं दिसतंय. मुलाने शाळेत नॉनव्हेज आणल्याचा आरोप मुख्याध्यापकांनी केलाय. यासोबतच मुख्याध्यापकांनी शाळेच्या आवारामध्ये बांधलेले मंदिर पाडल्याचा आणि इतर मुलांना मांस खाऊ घातल्याचा आरोप देखील केलाय.

मुख्याध्यापकावर कारवाई होणार का?

तर या महिलेने मुख्याध्यापकावर मुलाला ओलीस ठेवल्याचा देखील आरोप (Viral Video) केलाय. सध्या हा 7 मिनिटांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने कारवाई करत व्हिडिओच्या सखोल चौकशीचे आदेश दिलेत. यासाठी तीन सदस्यांची टीम देखील तयार करण्यात (Viral News) आलीय. अमरोहा पोलिसांनीही देखील कसून तपास करण्यास सांगितलंय. त्यामुळे घटनेची सतत्या पडताळली जाणार आहे, घटना खरी असल्यास मुख्याध्यापकावर कारवाई होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

SCROLL FOR NEXT