Crime Saam Tv
देश विदेश

आईच्या मैत्रिणीवर जीव जडला, आधी प्रेम नंतर बसमध्ये हत्या; मृतदेहाचे तुकडे करून गटारात फेकले

Man Kills Lover in Bus: नोएडा येथे प्रियकराने प्रेयसीची हत्या केली. नंतर तिचे तुकडे गटारीत फेकले. आरोपीनं प्रेयसीची हत्या केल्याची कबुली दिली.

Bhagyashree Kamble

नोएडाच्या सेक्टर ३९ मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शुक्रवारी पोलिसांनी एका महिलेचा निर्घृण हत्येचा उलगडा केला. ६ नोव्हेंबर रोजी सेक्टर १०८ परिसरातील नाल्यात महिलेचं कापलेले डोके आणि दोन्ही पाय सापडले. महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तसेच आरोपीला बेड्या ठोकल्या. ब्लॅकमेलिंगला कंटाळून विवाहित पुरूषाने प्रेयसीची हत्या केली. प्रेयसी पण विवाहित असून, मृत महिला आरोपीच्या आईची मैत्रिण होती.

डीसीपी यमुना प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या पायात जोडवी होती. यावरून महिला विवाहित असल्याचा पोलिसांना अंदाज आला. सीसीटीव्हीत ५ नोव्हेंबर रात्री आरोपी बसची लाईट बंद करून चालवत असल्याचं समोर आलं. ही बस आरोपी मोनू सोलंकी (वय वर्ष ३४) चालवत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी तपास करण्यासाठी मोनूच्या घरात धाव घेतली.

मोनूच्या घरात तेव्हा त्याची आई, पत्नी आणि ५ मुले होती. मात्र, मोनू घरी नव्हता. तो फरार होता. ५ मुलांपैकी २ मुले ही प्रीतीची होती. त्यांनी आई हरवली असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी प्रीतीच्या जोडवीचा फोटो दाखवला. जोडवीवरून मुलांनी आई (प्रीती)ला ओळखलं. शुक्रवारी पोलिसांनी मोनूला अटक केली. तपासादरम्यान, आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

प्रेमसंबंध कसे निर्माण झाले?

मोनूची आई जीन्स कारखान्यात काम करत होती. प्रीतीही त्याच ठिकाणी काम करायची. दोन वर्षांपूर्वी कारखाना बंद झाला होती. प्रीती मोनूच्या घरी ये-जा करू लागली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी वाहनांची तपासणी केली.

पोलीस चौकशीत आरोपीनं सांगितलं की, प्रीतीचे दोनवेळा लग्न झाले होते. दोन्ही पतींनी तिला सोडून दिले होते. ती त्याला सतत ब्लॅकमेल करत होती. मोनूच्या दोन्ही मुलींना अनैतिक कृत्यांमध्ये ढकलण्याची धमकी ती देत होती. या त्रासाला कंटाळून त्याने हत्या करण्याचा निर्णय घेतला.

आरोपीनं पोलिसांना सांगितले की, ५ नोव्हेंबर रोजी मोनू प्रीतीच्या घरी गेला. नंतर बसमधून बाहेर गेले. बसमध्ये दोघांमध्ये वाद झाला. नंतर त्याने धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. नंतर मुलांना घरी सोडले. प्रीतीचे तुकडे नाल्यात फेकले'. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याण डोंबिवली मधील शिवसेनेचे ५३ नगरसेवक कोकण भवन येथे दाखल

Shiv Sena : पुन्हा तारीख पे तारीख; शिवसेना कुणाची? आता या दिवशी होणार सुनावणी

Celebrity Mangalsutra Design: दीपिका ते कियारा; बॉलिवूड अभिनेत्रीच्या 'या' नाजूक मंगळसूत्रांची सध्या सोशल मीडियावर क्रेझ

यावर्षी किती लाख कोटींचे सामंजस्य करार होणार? थेट दावोसहून उदय सामंत EXCLUSIVE

Lung Cancer Symptoms: कोणतेही व्यसन नसतानाही फुफ्फुसांचा कॅन्सर होतो? आताच जाणून घ्या लक्षणं अन् डॉक्टरांचा इशारा

SCROLL FOR NEXT