Body Massage Saam Tv
देश विदेश

Body Massage: बॉडी मसाजच्या नावाखाली 'डर्टी गेम', तरूणींचे अश्लील फोटो काढायचे, व्हायरल करण्याची धमकी देत पैसे लुबाडायचे

Noida Police Crack Down on Massage Parlor Extortion: नोएडामध्ये बॉडी मसाजच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग रॅकेटचा पर्दाफाश – ७५ लोकांची फसवणूक, ३ अटकेत, १ महिला फरार.

Bhagyashree Kamble

नोएडामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पोलिसांनी एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी बॉडी मसाजच्या नावाखाली मुलींचे आक्षेपार्ह स्थितीतील फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळत होते. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तीन जणांना अटक केली आहे. सध्या या प्रकरणातील एक महिला फरार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून ५ मोबाईल जप्त केले असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

डीसीपी सेंट्रल नोएडा शक्ती मोहन अवस्थी म्हणाले की, अलीकडेच २ तरूणींनी बॉडी मसाजच्या नावाखाली फसवणूक झाल्याची तक्रार केली होती. ही टोळी मसाज करताना मुलींचे आक्षेपार्ह फोटो काढत असे. नंतर व्हायरल करण्याची धमकी देतात. धमकी देऊन ही टोळी मुलींकडून १५ ते २० हजार रूपयांची मागणी करतात. ही बाब समोर आल्यानंतर पोलीस ठाण्याच्या प्रभारी यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले.

रविवारी पथकाने कसून चौकशी करून आग्रा येथील रहिवासी शिवम शर्मा, रोहित कुमार आणि हरियाणातील रहिवाली राजन उर्फ राजू या आरोपींनी अटक केली. दरम्यान, त्यांच्या टोळीतील एक महिला फरार असल्याची माहिती आहे.

नेमकं प्रकरण काय?

आरोपींनी आधी जस्ट डायलवर बिझनेस प्रोफाईल तयार केले. मसाजसाठी बुकिंग मिळताच, आरोपी मुलींना सांगितलेल्या ठिकाणी पाठवत असे. नंतर ही टोळी ग्राहकाचे मसाज करून त्यांचे आक्षेपार्ह फोटो काढत असे. फोटो काढल्यानंतर ही टोळी ग्राहकांना ब्लॅकमेल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून १५ ते २० हजार रूपये उकळत असे. पोलिसांनी तपास करून आरोपींकडून पैसे आणि ५ मोबाईल फोन जप्त केले आहेत.

७५ लोकांची फसवणूक

चौकशीदरम्यान, आरोपींनी आतापर्यंत सुमारे ७५ लोकांना धमकी देऊन पैसे उकळल्याचे उघड झाले आहे. शिवम आणि रोहित आधीपासून मित्र होते. दोघांनी राजनला आपल्या गटात सामील केले. तसेच यात एका महिलेचाही समावेश आहे. महिला सध्या फरार असून, पोलिसांनी तिला वॉन्टेड घोषित केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Stones : तुम्हाला किडनी स्टोन झालाय? रोज खा 'ही' ४ हिरवी पाने

Maharashtra News Live Update: दुष्काळाच्या मागणीसाठी शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले; सोयाबीन जाळून निषेध

Gold Rate Today: पितृपक्ष सुरू होताच सोनं-चांदी अचानक स्वस्त! सुवर्णनगरीत मोठी घसरण; वाचा आजचे नवे दर

यायचं असेल तर आमच्यासोबत या! राष्ट्रवादी विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाताचा थरार, एकमेकांना धडक देत २ वाहने दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT