Noida Car Accident | नोएडामध्ये भीषण कार अपघातात तिघांचा मृत्यू झाला.  वृत्तसंस्था
देश विदेश

Noida Accident News : दुर्दैवी! बर्थडे सेलिब्रेशननंतर घरी परतताना भरधाव कार खांबाला धडकली, सख्ख्या भावंडांसह तिघांचा मृत्यू

Saam Tv

नोएडा : राजधानी दिल्लीला लागूनच असलेल्या नोएडात भीषण अपघात घडला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर परतताना भरधाव कार खांबाला धडकून झालेल्या अपघातात तिघा तरुणांचा मृत्यू झाला. यात दोघा भावांचा समावेश आहे.

नोएडाच्या (Noida) मयूर चौकासमोरच हा अपघात (Accident) झाला. भरधाव कार रस्त्यालगत असलेल्या खांबाला धडकली. कारमध्ये असलेले तीन तरूण त्यात गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथल्या डॉक्टरांनी तपासून तिघांनाही मृत घोषित केले. दोन जणांची ओळख पटली असून, ईशान आणि आर्यन अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे पाम ओलंपिया सोसायटीत राहत होते. तर तिसऱ्या तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.

सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

तिघेही तरूण वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर घरी परतत होते. त्याचवेळी सकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास त्यांच्या कारला अपघात झाला. डुलकी लागल्याने कार (Car Accident) अनियंत्रित झाली आणि रस्त्यालगत असलेल्या खांबाला धडकली, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अन् कार अनियंत्रित झाली!

स्थानिकांच्या माहितीनुसार, अपघात झाला त्यावेळी कारचा वेग जास्त होता. ती कार इतक्या जोरात खांबाला धडकली की, कारच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला. चालकाला डुलकी लागल्याने कार अनियंत्रित झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अपघाताची माहिती मृतांच्या कुटुंबीयांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार, तिघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. दोघांची ओळख पटली आहे. नोएडा एक्स्टेंशनमध्ये ते राहत होते. ईशान आणि आर्यन अशी दोघांची नावे असून, ते सख्खे भाऊ होते. तर वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत तिसऱ्या युवकाची ओळख पटलेली नव्हती.

अपघाताची चौकशी सुरू

रिपोर्टनुसार, कार खांबाला धडकली तेव्हा तिचा वेग अंदाजे १०० ते १२० किलोमीटर प्रतितास होता. खांबाला धडकल्यानंतर कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. तरूण गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तिघांनाही बेशुद्धावस्थेत नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथं तपासणी करून मृत घोषित केले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी जमावाला तेथून हटवले आणि वाहतूक सुरळीत केली. या अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT