toll plaza, nitin gadkari, nhai,  saam tv
देश विदेश

देशातील टोल नाके हाेणार हद्दपार; जाणून घ्या नेमकं कारण

या संकल्पनेची सुरुवात राजस्थानपासून होत आहे.

साम न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : देशातील (india) विविध महामार्गांवरील टाेल नाक्यांवर (toll plaza) लागणारी वाहनांची (vehicle) लांबच लांब रांग टाळण्यासाठी केंद्र सरकारने फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित आणली. परंतु टोलनाक्यांवरील लांबलचक रांगांमध्ये काहीच फरक पडला नाही. दरम्यान, आता त्यापूढे जाऊन सरकार एएनपीआर (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर) (Automatic Number Plate Reader) प्रणाली कार्यान्वित करण्याच्या विचारधीन आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर देशातील प्रमख टाेल नाक्यांसह छाेटे छाेटे टाेलनाके हद्दपार हाेतील असा विश्वास प्रशासकीय अधिक-यांकडून व्यक्त केला जात आहे. (toll plaza latest marathi news)

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून ही नवी संकल्पना घेऊन येत आहे. या अंतर्गत, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) राजस्थानमध्ये (Rajasthan) असा ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वे बनवत आहे, जिथे एकही टोल बूथ (toll booth) नसेल. याचा सर्वात मोठा फायदा वाहन चालकांना हाेणार आहे. जितकी रक्कम महामार्गावरून जाण्यासाठी निश्चित करण्यात आली आहे तितकीच रक्कम त्याच्याकडून घेतली जाणार आहे.

आता नंबर प्लेट हाेणार स्कॅन

सध्या महामार्गावरून प्रवास करताना वाहनावर लावलेल्या फास्टॅगमधून टाेलची आकारणी केली जाते. नवीन तंत्रज्ञान लागू झाल्यानंतर तुमच्या वाहनाची नंबर प्लेट स्कॅन केली जाईल आणि फास्टॅगमधून पैशांची आकारणी हाेईल. यामध्ये किलोमीटरच्या आधारे आकारणी हाेणार असल्याचे मानले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, टोलवर एकाच वेळी पैसे वसूल केले जात होते. मात्र नवीन प्रणालीनूसार महामार्गावर एकच एंट्री (प्रवेश) आणि एक्झिट (बाहेर) पॉइंट असेल. वाहन दाखल होताच नंबर प्लेट स्कॅन हाेईल. त्यानंतर प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या अंतरानुसार प्रवाशांच्या खात्यातून पैसे कापले जातील.

राजस्थानपासून सुरुवात होईल

या संकल्पनेची सुरुवात राजस्थानपासून होत आहे. भारत माला प्रकल्पांतर्गत राजस्थानमध्ये ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वे बनवला जात आहे. प्राप्त माहितीनुसार, राजस्थानमध्ये त्याची एकूण लांबी 637 किलाे मीटर असेल. हा एक्स्प्रेस वे पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरातमधून (gujarat) जाणार आहे. त्याची लांबी 1224 किलाे मीटर असेल. हा ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे पंजाबमधील अमृतसर ते गुजरातमधील जामनगरपर्यंत सुरू होईल. ते राजस्थान या दोन शहरांना जोडेल. या NH वरून अरबी समुद्रातील बंदरापर्यंत कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राजस्थानला एक समर्पित एक्सप्रेस वे मिळेल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT