CJP PROTESTERS STAND FIRM; NO WITHDRAWAL WITHOUT MINISTER’S RESIGNATION saam tv
देश विदेश

CJP Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाहीच; CJP आंदोलनावर ठाम

CJP Protest: जंतरमंतरवरील आंदोलक केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे जंतरमंतरवरील आंदोलक मागे हटण्यास तयार नाहीयेत. मात्र, सरकार बळाचा वापर करत आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करतंय. मात्र, आंदोलकांनी सरकारला कसं जेरीस आणलंय? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट.

Suprim Maskar

जंतरमंतरवर पोलिसांनी पुन्हा विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्यानं धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आंदोलक आडून बसलेत. अशातच केंद्र सरकार विद्यार्थ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी खाकीचा वापर करतेय. 22 जुलैलाही मध्यरात्री पोलिसांनी पुन्हा एकदा जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केलाय.22 जुलैला जंतरमंतरजवळील इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली होती.विशेष म्हणजे ही कारवाई होणार असल्याचं केजरीवालांनी काही तास आधीचसोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून सांगितलं होतं.

पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतरही विद्यार्थ्यांनी माघार न घेता रात्रभर जंतर-मंतरवर खडा पहारा दिला. आणि पहाटे पाच वाजता जंतर मंतरवर आंदोलकांनी एकत्र येत आपला निर्धार कायम ठेवला. तर दुसरीकडे भाजपनं बाहेरचे गुंड आणून आंदोलकांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप CJPच्या अभिजित दिपकेंनी केला.तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कोणत्याही दोषीला पाठीशी घातलं जाणार नाही, असा इशारा देत पेपरफुटीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे निर्देशच पंतप्रधान मोदींनी दिले आहेत.

मात्र सीजेपी प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम असल्यामुळे सरकारला घाम फुटलाय. सरकार उपाययोजना करत असल्याच्या घोषणा करत आहे. सीजेपीच्या मागणीनुसार जंतरमंतरवर जाऊन चर्चा करण्याचा मार्ग सध्या तरी सरकारनं खुला ठेवलेला नाही. त्यामुळे अजून कीती दिवस ही कोंडी कायम राहणार याकडे देशाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kuka Cold Coffee Recipe: संध्याकाळी नाश्त्यासोबत घरी बनवा कॅफेसारखी स्वादिष्ट आणि क्रिमी कुक्का कॉफी, वाचा रेसिपी

पुण्यात CBI चा मोठा छापा! MIL अधिकाऱ्याच्या घरातून १.७३ कोटींची रोकड जप्त, काय आहे प्रकरण?

Plane Crash: अमेरिकेत भीषण विमान अपघात! घिरट्या घेत जमिनीवर कोसळलं; सहा जणांचा जागीच मृत्यू

Ulhasnagar Firing: उल्हासनगर हादरलं! भरदिवसा रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार, एकाचा मृत्यू

Thursday Horoscope: पडणार पैशांचा पाऊस! 4 राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT