Nitish Kumar Saam tv
देश विदेश

Nitish Kumar : देशात मोठी राजकीय घडामोड होणार, इंडिया आघाडीत नितीश कुमार यांची वापसी होणार? RJDच्या बड्या नेत्याचा दावा

Nitish Kumar News : देशात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीत नितीश कुमार यांची वापसी होणार असल्या दावा RJDच्या बड्या नेत्याने केला आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री, जनता दल युनायटेडचे प्रमुख नीतीश कुमार हे लवकरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीत येणार आहे, असा दावा राष्ट्रीय जनता दलाच्या आमदाराने केला आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या आमदाराने केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय जनता दल पक्षातील आमदार वीरेंद्र सिंग यांनी मोठा दावा केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार हे लवकरच भाजपची साथ सोडेल, असा दावा त्यांनी केला आहे. भाजपची साथ सोडल्यानंतर ते इंडिया आघाडीसोबत जातील. यानंतर भाजप बिहारमध्ये पराभूत होईल, असाही दावा त्यांनी केला आहे.

बिहारमध्ये भाजप नेते अश्विनी चौबै यांनी बिहारमधील एनडीएच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यंदा बिहारमध्ये एनडीएने भाजपच्या नेतृत्वात निवडणूक लढवली पाहिजे. भाजपच्या नेतृत्वात एनडीए सरकारची स्थापना झाली पाहिजे, असे वक्तव्य चौबे यांनी केलं.

अश्विनी चौबे यांनी म्हटलं की, 'बिहारमध्ये पूर्ण बहुमताने भाजपचं सरकार आलं पाहिजे. पक्षात आम्हाला आयात माल नको'.

अश्विनी चौबे यांनी म्हटलं की, 'मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत केंद्रीय नेतृत्व निर्णय घेतील'. चौबे पुढे म्हणाले,'माझी इच्छा आहे की, भाजप नेतृत्वात बिहारमध्ये सरकारची स्थापना झाली पाहिजे. अशी आमची इच्छा आहे. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम सुरु करायला हवं. मी यासाठी कोणत्याही मागणीशिवाय काम करु इच्छित आहे.'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

SCROLL FOR NEXT