Nitish Kumar Saam Tv
देश विदेश

आता 'या' राज्यात भाजपचा मुख्यमंत्री, मित्रपक्षाचे CM राजीनाम देणार, शपथविधी कधी होणार?

Nitish Kumar Rajya Sabha news : बिहारच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार राज्यसभेत जाण्याच्या तयारीत असून त्यांच्या राजीनाम्यानंतर बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Namdeo Kumbhar

Nitish Kumar resignation : बिहारच्या राजकारणात मोठा ट्वीस्ट आला आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी केंद्रीय राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बिहारमध्ये आता सत्तांतर होऊ शकते. त्यामुळे आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये भाजप सत्ता स्थापन करणार आहे. तर नीतीश कुमार यांचा मुलगा उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान होईल. नीतीश कुमार यांचे केंद्रात जाणं जेडीयूच्या कार्यकर्त्यांना रूचलेले नाही, पाटण्यात जोरदार आक्रोश पाहायला मिळत आहे.

नितीश कुमार कधी राजीनामा देणार ?

मुख्यमंत्री नितीश कुमार हे आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लगेचच मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल असे नाही. परिस्थिती प्रतिकूल होऊ नये म्हणून भाजपला शक्य तितक्या लवकर हे पद मिळवायचे असेल. पण दुसरीकडे नितीश कुमार यांना निर्णय घेण्यासाठी वेळ असेल. राज्यसभेसाठी नामांकन ५ मार्च रोजी म्हणजेच आज होईल आणि ते १६ मार्च रोजी बिनविरोध निवडून येतील हे निश्चित आहे. त्यानंतर सध्याच्या राज्यसभेच्या खासदारांचा कार्यकाळ ९ एप्रिलपर्यंत असल्याने नितीश कुमार यांना तोपर्यंत मुख्यमंत्रीपदी राहण्यात कोणतीही तांत्रिक अडचण नाही.

खरमासच्या नावावर भाजप ही खेळी करू शकतो -

नितीश कुमार यांना राज्यातून केंद्रात घेऊन जाणं भाजपसाठी सोपं नाही. पण राज्यसभेवर जाण्याबाबत नीतीश कुमार यांनी निर्णय घेतला. पण राज्यातील सत्तासमीकरणावर अद्याप निर्णय झाल्याचे दिसत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करेल. भाजपकडून जेडीयूला २ उपमुख्यमंत्रीपदाची ऑफऱ देऊ शकते.

खरमास १५ मार्च नंतर सुरू होत आहे आणि १६ मार्च रोजी बिनविरोध राज्यसभेचा विजय जाहीर होणार आहे. २०२ आमदारांचे पाठबळ असल्याने नीतीश कुमार बिनविरोज राज्यसभेवर जातील. जेडीयूचे दोन उपमुख्यमंत्री प्रस्तावित करून नितीश कुमार यांच्याकडून लवकरात लवकर राजीनामा घेण्याचा भाजप प्रयत्न करेल. त्यामुळे भाजप खरमासपूर्वी नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा करू शकतो, असे राजकीय तज्ज्ञांकडून सांघण्यात येत आहे.

निशांत कुमार सांभाळणार जेडीयूची धुरा, उपमुख्यमंत्रीही होणार

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी चर्चा केल्यानंतर केंद्रीय मंत्री ललन सिंह निशांत कुमार यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. ललन सिंह निशांत कुमार यांच्याशी भविष्यातील राजकीय घडामोडीवर चर्चा केली. निशांत यांची नेमकी भूमिका काय असेल? त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल? या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निशांत कुमार यांच्याकडे जनता दल युनायटेड (JDU) चे नेतृत्व सोपवण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना उपमुख्यमंत्री बनवण्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे.

नितीश कुमार यांना दिल्लीला जाऊ देणार नाही

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेत केलेल्या घोषणा केल्यानंतर जेडीयूचे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. जेडीयूच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मतदान केले. नितीश कुमार यांनी जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा आवाज ऐकला पाहिजे. राज्यातील सर्वजण पाटणा येथे पोहोचत आहे. आम्ही त्यांना कोणत्याही किंमतीत दिल्लीला जाऊ देणार नाही. जनतेने त्यांना मुख्यमंत्री केले आहे. हा अन्याय आहे. बिहार हा नितीश कुमारांचा परिवार आहे. ते बिहारच्या लोकांना कसे सोडून देऊ शकतात? जेडीयूच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर घोषणाबाजी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

'वेलकम टू हेल' इराणचा अमेरिकेला इशारा, इराणची धमकी, जगाला धडकी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

SCROLL FOR NEXT