Nitish Kumar Saam TV
देश विदेश

Nitish Kumar resigns as Bihar CM : बिहारमध्ये राजकीय भूकंप; नितीशकुमार यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर RJDवर निशाणा, म्हणाले...

Bihar Political Crises : सरकारच्या सर्व कामांचे श्रेय राजद घेत आहे. मी काम करत होतो पण मला काम करू दिले जात नाही, दोन्ही बाजूंनी पेच निर्माण झाला आहे, असं नितीश कुमार यांनी म्हटलं.

प्रविण वाकचौरे

Bihar Political News :

बिहारच्या राजकारण आज मोठा भूकंप झाला आहे. आज सकाळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या पक्षावर जोरदार निशाणा साधला.

आमच्या पक्षात चर्चा झाल्यानंतर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या सर्व कामांचे श्रेय राजद घेत आहे. मी काम करत होतो पण मला काम करू दिले जात नाही, दोन्ही बाजूंनी पेच निर्माण झाला आहे, असं नितीश कुमार यांनी म्हटलं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नितीश कुमार यांनी पुढे म्हटलं की, सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याने मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची गरज निर्माण झाली.आम्ही काहीही बोलणे बंद केले होते. परंतु पक्षातून सर्वजण मतं व्यक्त करत होते, त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला. दीड वर्षांपूर्वी झालेल्या राजदसोबतच्या युतीत परिस्थिती चांगली दिसत नव्हती. राजदकडून ज्या प्रकारचे दावे केले जात होते त्यासोबत आम्ही सहमत नव्हतो, असंही नितीश कुमार यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल

नितीश कुमार रविवारी संध्याकाळी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. बिहारच्या विधानसभेची पक्षीय बलाबल पाहिली तर भाजपकडे विधानसभेच्या 78 जागा आहेत, तर जेडीयूकडे 45 आमदार आहेत. तर एनडीएचा मित्रपक्ष एचएएमचे ४ आमदार आहेत. त्यामुळे भाजप-जेडीयूकडे बहुमतापेक्षा 5 जास्त अशी 127 आमदारांचा पाठिंबा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT