Accident news update Saam TV
देश विदेश

रोहिणी पुलावरुन बस थेट नदीत कोसळली, ९ जणांचा मृत्यू, ३२ जखमी

बुटवाल मध्ये एका बसला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नरेश शेंडे

बुटवाल : नेपाळच्या (Nepal) रुपनदेही जिल्ह्यात बुटवाल मध्ये एका बसला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोहिणी ग्रामीण महानगरपालिका हद्दीतील पारसी भैरहवा या रस्त्यावर असलेल्या रोहिणी पुलावरुन (Bus Accident) बस थेट नदीत कोसळली. हा अपघात रविवारी सकाळी रुपनदेहीत झाला. या भीषण अपघातात बसचा चक्काचूर होऊन (nine people dead) ९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३२ जण जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, जनकपूर येथून निघालेली बस भैरहवाकडे जात होती. त्याच दरम्यान ही बस नदीत कोसळून भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना भैरवहाच्या भीम रुग्णालयात आणि वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या अपघाताता ९ जणांचा मृत्यू झाला असून चौघांची ओळख पटली आहे. योगीकुटी येथील बिष्णू पौडेल, कलिका नगर येथील क्रिष्णा प्रसाद बसयाल, रौताहट येथील दिनेश दास तसेच ओमसातीयाचे राजेंद्र प्रसाद पांडे, अशी मृतांची नावे आहेत. मृतांमध्ये ८ पुरुषांचा आणि एक महिलेचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Kidney Stone: टोमॅटो खाल्ल्याने किडनीमध्ये स्टोन होतो? डॉक्टरांनी सांगितलेलं सत्य वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Gold Price Today: खुशखबर! ऐन गणेशोत्सवात सोन्याच्या दरात मोठी घसरण! 18K, 22K आणि 24K सोन्याचे आजचे दर वाचा

Garuda Purana: मृत्यूनंतर आत्म्याला नवीन शरीर किती दिवसांनी मिळतं? गरुड पुराणात दिलीये माहिती

Bipasha Basu: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या; तुकाराम मुंढेंना टॅग करत केली कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT