न्यूजक्लिक या वृत्तसंस्थेशी संबंधित असलेल्या पत्रकारांच्या घरी दिल्ली पोलिसांनी छापेमारी केली आहे. मंगळवारी सकाळपासूनच पत्रकारांच्या घरी छापेमारी करण्यास सुरुवात करण्यात आलीये. ३० हून अधिक पत्रकारांच्या घरी छापेमारी झाल्याची माहिती मिळाली आहे.
ऑगस्ट महीन्यापासून न्यूजक्लिक वृत्तसंस्थेचं नाव चर्चेत आलंय. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासात न्यूजक्लिकचे मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावर कारवाई केली होती. त्यांचा दिल्लीतील फ्लॅट जप्त करण्यात आला होता.
ईडीच्या तपासात विदेशी निधीची फसवणूक झाल्याचे समजले होते. यामध्ये फक्त तीन वर्षांच्या कालावधीत ३८.०५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले.
न्यूजक्लिक वृत्तसंस्थेला चीनकडून निधी मिळतो असा आरोप करण्यात आलाय. तब्बल ३८ कोटींच्या फंडिंगचा आरोप आहे. फक्त दिल्लीतच नाही तर गाझियाबाद आणि नोएडामध्येही पोलीसांचा शोध सुरू आहे. UAPA अंतर्गत दाखल गुन्ह्यातील तपासात ही कारवाई करण्यात आली आहे.
दिल्लीत पत्रकारांसह लेखकांच्या घरावरही छापेमारी झालीये. यामध्ये त्यांच्याजवळील मोबाईल, लॅपटॉप अशी सर्व साधने जप्त करण्यात आलीयेत. सर्व डिजीटल पुरावे आणि हार्डडिक्सही जप्त करण्यात आल्यात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.