देश विदेश

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

Newlywed Groom Dies in Post-Wedding Helicopter Accident : जॉर्जियामध्ये लग्नाच्या काही तासांनंतर झालेल्या एका भीषण हेलिकॉप्टर अपघातात नवरदेवाचा मृत्यू झाला. नवरी जवळपास सहा तास हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात अडकली होती.

Bharat Jadhav

  • जॉर्जियामध्ये लग्नानंतर नवविवाहित जोडप्याचे हेलिकॉप्टर कोसळले.

  • भारतीय वंशाचे नवरदेव व पायलट डेव्ह फिजी यांचा अपघातात मृत्यू झाला.

  • नवरी जेसी सहा तास ढिगाऱ्याखाली अडकली होती.

अमेरिकेतील जॉर्जियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्न आटोपून हेलिकॉप्टरनं निघालेल्या नवविवाहित जोडप्याचा अपघात झाला आहे. यात एका भारतीय वंशाच्या नवरदेव पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. त्याची पत्नी जखमी झाली असून ती सुमारे सहा तास हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात अडकली होती.

डेव्ह फिजी आणि जेसी यांचे लग्न 29 मे रोजी डॉसनविल येथील 'द रिव्हिएर' येथे झाले होते. या सोहळ्याला अंदाजे 400 पाहुणे उपस्थित होते. लग्नानंतर नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने अटलांटाला गेले, परंतु उड्डाणानंतर हेलिकॉप्टर कोसळले.

हाती आलेल्या माहितीनुसार डेव्ह फिजीचे आई-वडील मूळचे केरळ राज्यातील आहेत. येथील एर्नाकुलम जिल्ह्यातील मुवाट्टुपुझा गावातील ते रहिवाशी आहेत. जेसीचे कुटुंब केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यातील आहे.आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर डेव्हचे वडील, जॉर्ज फिजी म्हणाले की, देवाने त्यांना एक अविस्मरणीय लग्नाचा दिवस दिला होता, पण काही तासांनंतरच दुखाचा डोंगर कोसळला.

दरम्यान अमेरिकेचे राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ (NTSB) या दुर्घटनेचा तपास करत आहे. या संस्थेने अद्याप अपघाताचे कारण जाहीर केलेले नाहीये. प्राथमिक तपास अहवाल पुढील ३० दिवसांत अपेक्षित आहे. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, डेव्ह फिजीला लहानपणापासूनच पायलट बनायचं होतं. त्याने आपले स्वप्न साकार करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि नंतर तो डेल्टा एअरलाइन्समध्ये फर्स्ट ऑफिसर बनला होता. डेव्हला उड्डाण आणि विमानांची प्रचंड आवड होती.

दरम्यान अपघातापूर्वी डेव्हने खराब हवामानाबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्याच्या वडिलांनी सांगितलं की, लग्न संपेपर्यंत परिसरात दाट धुके आणि पाऊस सुरू होता, त्यामुळे स्पष्टपणे पाहणे कठीण झालं होतं. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, डेव्हने हेलिकॉप्टर पायलटला उड्डाण न करण्यास सांगितले होते. पण पायलटने त्याला अधिक उंचीवर उड्डाण करण्याचे आश्वासन दिले, त्यानंतर प्रवास सुरू ठेवण्यात आला. पण उड्डाण घेताच हेलिकॉप्टर कोसळलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

'शिवाजी कोण होता?'चं बनावट पुस्तक? पानसरेंच्या पुस्तकाचं परवानगीविना प्रकाशन?

रखडलेले काम पूर्ण होणार, कार्यालयात मोठी जबाबदारी मिळणार; ५ राशींच्या लोकांवर होणार श्री गणेशाची कृपा

SCROLL FOR NEXT