couple dance video viral saam tv
देश विदेश

viral Video: अरे बापरे! DJ च्या तालावर थिरकले नवरा-बायको, नंतर असं काही घडलं...,सर्वांना बसला धक्का

सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील व्हिडिओ पाहण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे.

नरेश शेंडे

सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील व्हिडिओ पाहण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. नेटकरी असे व्हायरल व्हिडिओ पाहणे पसंत करताना दिसत आहेत. अशातच नवरा-बायकोचा व्हिडिओ पाहण्याची गोष्टच वेगळी आहे. नेटकऱ्यांची मनं जिंकण्यासाठी वधू तिच्या दिलखेचक अदांनी मनोरंजन करत असते. तर कधी कपल त्यांच्या धमाकेदार (Dance video) डान्सच्या व्हिडिओनं इंटरनेटवर जलवा करताना दिसतात. पण, आता एक असा व्हिडिओ समोर आला आहे, ज्या व्हिडिओला पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. खरंतर, नवरा-बायको डीजेच्या तालावर थिरकत असताना अचानक एक अपघात होतो आणि लोकांना धक्काच बसतो. (Newly married couple dance video viral on social media)

काय घडलं नेमकं?

व्हायरल झालेल्या व्हिडिओत नवरा-बायको डीजे लावल्यानंतर डान्स करत असतात. डान्स फ्लोअर वर जोरदार म्यूजिक सिस्टमचा आनंद लुटताना अचानक त्यांच्या अंगावर एक मोठा स्पीकर पडतो. त्यानंतर दोघंही खडबडून जागे होतात आणि डान्सच्या दुनियेतून बाहेर पडतात.त्यानंतर शेजारी असलेली लोकं तातडीनं स्टेजवर धाव घेतात आणि परिस्थितीचा आढावा घेतात. दरम्यान, या अपघातात नवख्या दाम्पत्याला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाहीय.

लग्नसोहळ्यातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. काहींना हा व्हिडिओ मजेशीर वाटल्यानं त्यांनी स्माईली इमोजीनं रिअॅक्ट केलं आहे. इंन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ gyanendra_703 नावाच्या युजरनं शेअर केला आहे. त्यानंतर त्याने कॅप्शन मध्ये लिहिलं, व्हिडिओ पाहून मनोरंजन झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vitamin deficiency: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे सतत जांभई येते?

Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक, ९ चिमुकल्यांसह १० जणांचा मृत्यू, तालिबानकडून कडक इशारा

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्र्यांच्या समोरच नवनीत राणा यांनी व्यक्त केली पुन्हा खासदार होण्याची इच्छा

'घरी लग्न आहे, आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवा', लेकाच्या निर्णयामुळे वडील ढसाढसा रडले, शेवटी आईचं शव मातीत पुरलं

Ajit Pawar: अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाची धडक, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

SCROLL FOR NEXT