कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढवली चिंता; 7 रुग्णांना लागण Saam Tv
देश विदेश

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढवली चिंता; 7 रुग्णांना लागण

नव्या व्हेरिएंटची आतापर्यंत 7 प्रकरणे आढळून आली आहे.

वृत्तसंस्था

इंदौर - कोरोना प्रार्दुभाव देशात आता दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या देखील नियंत्रणात आली आहे. मात्र अशातच एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. इंदौरमध्ये जीनोम सिक्वेन्सिंग तपास अहवालात कोरोनाचे AY-4 चे नवीन व्हेरिएंट आढळून आले आहे. हा डेल्टाचाच एक नवीन व्हेरिएंट असल्याचे बोलले जात आहे.

हे देखील पहा -

इंदौरसह मध्य प्रदेशातून नवी दिल्लीत पाठवण्यात आलेल्या नमुन्याच्या चाचणी अहवालात नव्या व्हेरिएंटची आतापर्यंत 7 प्रकरणे आढळून आली आहे.

इंदौरमध्ये सध्या दररोज १ ते २ कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यांचे नमुने तपासणीसाठी दिल्लीला पाठवण्यात आले होते. 16 ऑक्टोबरच्या अहवालात ७ नमुन्यांमध्ये हा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. त्यापैकी तीन महू, दोन जण न्यू पलासिया आणि एक दुबेची बाग येथील असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान,१ ऑक्टोबर पर्यंतच्या अहवालात, १३ नमुन्यांपैकी एका नमुन्यात AY-4 आणि चार नमुन्यांमध्ये AY-12 व्हेरिएंट आढळून आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT