Yeshwanthpur Mangaluru Central new Vande Bharat Express trial run saam tv
देश विदेश

बुलेट ट्रेनलाही देईल टक्कर! नव्या 'वंदे भारत'चा डॅशिंग लूक समोर; एकदा व्हिडीओ पाहाच

New Vande Bharat Express Yeshwanthpur Mangaluru Trial Run: यशवंतपूर-मंगळुरू सेंट्रल मार्गावर नव्या 16 डब्यांच्या वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी घेण्यात आली. पांढऱ्या-निळ्या रंगातील या ट्रेनचा शानदार लूक पाहा.

Omkar Sonawane

आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा विषय आला की भारतीय रेल्वेला सर्वाधिक पसंती दिली जाते. देशभरातील कोट्यवधी प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि वेगवान करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून आधुनिक आणि लक्झरी ट्रेन सेवा सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये वंदे भारत एक्सस्प्रेसला सर्वाधिक पसंती मिळाली असून, देशभरात या गाड्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान यशवंतपूर ते मंगळूर सेंट्रल या मार्गावर नव्या पांढऱ्या-निळ्या रंगाच्या वंदे भारत एक्सस्प्रेसची चाचणी करण्यात आली आहे. बंगळूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी या ट्रायल रनचा व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला आहे.

या नव्या सेमी हायस्पीड ट्रेनमुळे बंगळूर आणि कर्नाटकमधील इतर शहरांचे जाळे विस्तारणार असून अंतर कमी होणार आहे. ज्या रेल्वे मार्गावर ही चाचणी घेण्यात येत आहे, तो दक्षिण पश्चिम रेल्वेचा सुमारे 360 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे.

16 डब्यांची लक्झरी वंदे भारत

बंगळुरू DRM कडून यशवंतपूर-मंगळुरू सेंट्रल रेल्वे मार्गावरील ट्रायल रनचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये 16 डब्यांची पांढऱ्या आणि निळ्या रंगाची वंदे भारत एक्सप्रेस वेगाने धावताना दिसत आहे. या चाचणीचा मुख्य उद्देश संबंधित मार्गावर वंदे भारत ट्रेनला लागणारा प्रवासाचा वेळ, तिची कार्यक्षमता आणि विविध सेवांचे मूल्यांकन करणे हा आहे.

कर्नाटकातील 13वी वंदे भारत सेवा

ट्रायल रनचा व्हिडिओ शेअर करताना रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले की, या चाचणीदरम्यान ऑपरेशनल, TRO/TRD (इलेक्ट्रिकल), इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी विविध ऑपरेशनल तसेच सुरक्षेशी संबंधित बाबींवर लक्ष ठेवणार आहेत. सध्या कर्नाटकमध्ये 12 वंदे भारत एक्सस्प्रेस सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यशवंतपूर-मंगळुरू मार्गावर सुरू होणारी ही सेवा कर्नाटकातील 13वी वंदे भारत एक्सस्प्रेस ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना गणपती बाप्पा पावला! १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमच्या मोबाईलवर SMS आला का?

ज्ञानेश कुमारांविरोधात सुप्रीम कोर्टात धाव, 13 कोटी मतदार वगळल्याच्या चौकशीची मागणी

दुष्काळानं घेतला शेतकऱ्यांचा बळी, 24 तासांत राज्यातील 4 शेतकऱ्यांची आत्महत्या

अखेर महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत कधी? विरोधकांचा सवाल

जरांगे रुग्णालयात अंतरवालीतला मंडप हटवला, 3 वर्षांनी मंडप हटवला, जरांगेंचा नवा 'बॉम्ब'!

SCROLL FOR NEXT