Nepal  Saam tv
देश विदेश

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Nepal Protest NEWS : नेपाळमध्ये जेन झी आंदोलकांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घातला. मात्र गेल्या 4 वर्षात भारताच्या शेजारील 5 देशांमध्ये सत्तापालट झालाय. त्यामुळे शेजारील देशांमध्ये सुरु असणारी अशांतता भारतासाठी किती धोक्याची आहे? भारतावर याचा कसा परिणाम होऊ शकतो..पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Snehil Shivaji

भारताच्या सीमेपलिकडील देशात एकामागोमाग एक उद्रेक होऊ लागले आहेत आणि हे देश आंदोलनाच्या धगीत होरपळत आहेत.. तिथली सरकारं धडाधड कोसळतायेत. सर्व सामान्य नागरिकांनी केलेल्या उठावांनी आणि बंडखोरांच्या आंदोलनांनी सत्ताधारी देश सोडून पळू लागले. अशा या भारताच्या चहूबाजूनी असलेल्या देशांमध्ये पेटल्या वणव्यात आपला तिरंगा मात्र डौलानं फडकतोय. कारण शेजारील ७ देशांपैकी ५ देशात गेल्या चार वर्षांत हिंसक सत्तांतरं झालीयेत.

चार वर्षात शेजारील 5 देशात सत्तापालट

2025

नेपाळ

- सोशल मीडिया बंदी, भ्रष्टाचार आणि घराणेशाहीविरोधात नेपाळमध्ये आंदोलन

- आंदोलकांवर गोळ्या झाडत आंदोलन चिरडण्याचे प्रयत्न

- आंदोलनानंतर पंतप्रधानांचा राजीनामा देत दुसऱ्या देशात आश्रय

2024

बांग्लादेश

भ्रष्टाचार, मानवाधिकार उल्लघंन आणि आरक्षणाविरोधात बांग्लादेशात आंदोलन

- हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीनांचा राजीनामा आणि भारतात आश्रय

- सत्तांतरानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन

2022 - श्रीलंका

- आर्थिक संकटानंतर श्रीलंकेत महागाईविरोधात जनता रस्त्यावर

- राष्ट्रपती निवास, संसद आणि प्रमुख ठिकाणांवर आंदोलनकर्त्यांचा कब्जा

- आंदोलनामुळे मध्यरात्री देश सोडून राष्ट्रपतींचं मालदीवला पलायन

2021

अफगाणिस्तान

- 2020 अमेरिकेने अफगाणिस्तानातील सैन्य परत बोलवले

- परिस्थितीचा फायदा घेत तालिबानने हल्ला करून सत्ता उलथवली

2021

म्यानमार

- लष्कराने सरकारला उलथवून केला सत्तापालट

- लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सदस्य पायउतार

भारताच्या शेजारील देशांमध्ये झालेल्या बंडाचा आजवर भारतावर थेट परिणाम झालेला दिसत नाहीये. पण नेपाळ सोबत भारताचे गेल्या अनेक वर्षांपासून सलोख्याचे संबंध आहेत इतकंच नव्हे तर सीमावर्ती भागात रोटी बेटी व्यवहारही आहेत. भारतातून नेपाळला मोठ्या प्रमाणात वस्तूंची निर्यात होते. तुलनेत होणारी आयात नगण्य आहे. पाहुयात 2024–25 या दोन देशांमध्ये किती कोटींचा व्यवहार झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

Maharashtra Politics : शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची भेट;महापालिकेची रणनिती ठरली? VIDEO

SCROLL FOR NEXT