China Plane Crash Saam Tv
देश विदेश

Nepal Aircraft Crash: मोठी बातमी! नेपाळमध्ये विमान कोसळलं, भीषण अपघातात 32 जणांचा मृत्यू; बचावकार्याला सुरूवात

नेपाळमधून सध्या एक मोठ्या विमान अपघाताची बातमी समोर येत आहे. नेपाळमध्ये रविवारी एक मोठा विमान अपघात झाला.

Gangappa Pujari

Nepal: नेपाळमधून सध्या एक मोठ्या विमान अपघाताची बातमी समोर येत आहे. नेपाळमध्ये रविवारी एक मोठा विमान अपघात झाला. नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर यति एअरलाइन्सचे ATR-72 विमान कोसळले आहे. या भीषण अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून यामध्ये ३२ जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे. (NePal Plane Crash)

याबाबात अधिक माहिती अशी की, नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या भीषण अपघाताच्या बातमीने खळबळ माजली आहे. नेपाळच्या यति  एअरलाईन्सचं विमान कोसळलं आहे. या दुर्घटनाग्रस्त विमानात 72 जण होते. 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबरचा यामध्ये समावेश आहे. 

या भीषण अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अपघातानंतर घटनास्थळी बचावकार्याला सुरूवात झाली असून विमानतळावर मोठ्या प्रमाणावर आगीचे लोट दिसून येत आहेत. त्याचबरोबर या अपघातातील मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हवामान खराब असल्यानेही या विमानाचे उड्डाण करण्यात आले. यामुळेच हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. पोखरा विमानतळ डोंगराने वेढलेले आहे. त्याचबरोबर हवामानही खराब होते. तरीही उड्डाण करण्यात आल्याने हा अपघात घडल्याचीही माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार मेधा कुलकर्णी इलेक्ट्रिक वाहनाने विधान भवनात दाखल

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT