Nepal government introduces a new payroll system, allowing employees to receive salaries every 15 days. saam tv
देश विदेश

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Employee Salary : नेपाळच्या बालेन शाह सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना महिन्यातून दोनदा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील आर्थिक व्यवहार पूर्ववत करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Bharat Jadhav

  • नेपाळ सरकारचा मोठा निर्णय – महिन्यातून दोनदा पगार

  • १७ एप्रिलपासून नवीन वेतन पद्धती लागू

  • सरकारी कर्मचारी, पोलीस यांना थेट फायदा

नेपाळमध्ये नवीन सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्याने सुधारणा होत आहेत. आता नेपाळ सरकारन सरकारी नोकरदाराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आता दोन महिन्यांचे पगार मिळतील, अशी घोषणा नेपाळ सरकारच्या अर्थमंत्र्यांनी केली आहे. एजन्सीच्या माहितीनुसार, नेपाळी सरकारी अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे.

बालेन सरकारने १७ एप्रिल रोजी या निर्णयाला मंजुरी दिली आहे. आतापासून नेपाळी सरकारी कर्मचारी, पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार दर १५ दिवसांनी मिळणार आहे. नेपाळी अधिकाऱ्यांनुसार अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारचा असा विश्वास आहे की, महिन्यातून दोनदा पगार दिल्यास कर्मचाऱ्यांचा खर्च वाढू शकतो, ज्यामुळे बाजारात अधिक पैसा येईल आणि तरलता सुधारेल. नेपाळी कर्मचाऱ्यांच्या पगाराचे नियमन करणाऱ्या संस्थेनेही बालेन सरकारच्या या निर्णयावर एक निवेदन जारी केले आहे.

एफसीजीओचे प्रवक्ते दीपक लामिछाने म्हणाले, "तांत्रिकदृष्ट्या, ही प्रणाली लागू करण्यात आम्हाला कोणतीही अडचण नाही." आम्ही नागरी सेवक, नेपाळ सैन्य, पोलीस, सशस्त्र पोलीस दल आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कधीही देऊ शकतो." मात्र, या नवीन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी लागेल, यावरही त्यांनी भर दिला आहे.

नेपाळी संविधानानुसार, प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला महिन्याच्या शेवटी पगार देणे बंधनकारक आहे. सरकार या निर्णयासाठी कटिबद्ध असून लवकरच त्याची अंमलबजावणी करण्याचा मार्ग काढला जाईल,असे लामिछान म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेच्या कुरापतीमुळे इराणचा संताप

आता ATMवर मिळणार रेशन? रेशन दुकानात चकरा मारण्याचा त्रास वाचणार?

सोशल मीडियावर नालायकांची झूंड, उद्योजिका नमिता थापर यांना शिव्यांची लाखोली

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा भाजपला जोरदार धक्का, साताऱ्यातील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT